१३० वी घटना-दुरुस्ती विधेयक २०२५:भारताच्या राजकारणात एक ऐतिहासिक घडामोड घडली आहे. बहुतांश गंभीर आरोपाखाली अटकेत असलेले नेते, मंत्री हे अटकेत असून आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत. गृहमंत्री अमितभाई शाह यांनी संसदेत १३० वी घटना-दुरुस्ती विधेयक २०२५ सादर केले. या विधेयकामुळे देशातील मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा कोणतेही मंत्री जर गंभीर आरोपाखाली अटक होऊन ३० दिवस सलग तुरुंगात राहिले, तर त्यांना पद सोडावे लागेल. हे लागू होईल, मग तो राज्याचा मुख्यमंत्री असो, केंद्रातील मंत्री असो किंवा अगदी पंतप्रधानही का असेना! या सर्वांना वेसन बसणार आहे.
ही तरतूद जाहीर होताच संसदेत प्रचंड खळबळ उडाली आहे. चला तर मग जाणून घेऊ या या विधेयकाचे महत्व, फायदे, तोटे आणि राजकीय परिणाम.
Table of Contents
१३० वी घटना-दुरुस्ती विधेयक २०२५ : विधेयकातील प्रमुख तरतुदी
●अनुच्छेद ७५ (केंद्र) – पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्री जर ३० दिवस तुरुंगात राहिले तर त्यांचे पद आपोआप रिक्त होईल.
●अनुच्छेद १६४ (राज्य) – राज्यातील मुख्यमंत्री किंवा मंत्री यांनाही हेच नियम लागू.
●अनुच्छेद २३९AA (केंद्रशासित प्रदेश व दिल्ली) – येथेही समान तरतुदी लागू.तुरुंगातून सुटल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुन्हा नियुक्तीची संधी मिळू शकते.
विधेयकाचा विद्यमान राजकीय संदर्भ
केजरीवाल आणि सेंथिल बालाजी प्रकरण: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्या प्रकरणात, गंभीर आरोप असूनही ते बराच काळ तुरुंगात असतानाही त्यांच्या पदावर कायम राहिले. यामुळे “तुरुंगातून सरकार चालवणे” यावर मोठी चर्चा सुरू झाली होती. विरोधकांनी याला ‘नैतिकतेचा प्रश्न’ म्हटले होते. हे विधेयक अशाच घटनांना रोखण्यासाठी आणले आहे असे म्हटले जात आहे.
१३० वी घटना-दुरुस्ती विधेयक २०२५ :विधेयकाचे सकारात्मक पैलू
1. राजकीय नैतिकतेला बळ – अटक झालेले मंत्री सत्तेवर राहणे लोकांच्या विश्वासाला धक्का देणारे आहे. हे विधेयक त्या प्रश्नावर उत्तर देईल.
2. स्वच्छ प्रशासनाचा मार्ग – “गंभीर आरोप असूनही पदावर बसलेले” हे चित्र मिटू शकते.
3. जनतेचा विश्वास वाढवणे – सरकार व नेत्यांवरचा विश्वास अधिक मजबूत होऊ शकतो.
विरोधकांचे आक्षेप;लोकशाही धोक्यात?
विधेयक सादर झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
“लोकशाहीला धक्का” – तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी हे विधेयक “तानाशाहीचा मार्ग” असे म्हटले.“
आरोप म्हणजे दोष नाही” – एखाद्या नेत्यावर आरोप झाले म्हणजे तो दोषी आहे असे होत नाही. न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच पदच्युत करणे अन्यायकारक ठरू शकते.
दुरुपयोगाची शक्यता – विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, तपास संस्था (CBI, ED इ.) चा गैरवापर करून विरोधकांना तुरुंगात ठेवून पदांवरून हटवता येईल.
संविधानाशी विसंगती – “निष्पाप मानले जाईपर्यंत दोषी नाही” हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. ते तुटण्याची भीती आहे.या विधेयकाला विरोधकांनी तानाशाहीचे लक्षण आणि लोकशाहीला धोका असे म्हटले आहे.
त्यांच्या आक्षेपांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत:
‘आरोप म्हणजे दोष नाही’: कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्याआधी कोर्टात सुनावणी होणे आणि निर्णय येणे हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. या तत्त्वाला ‘innocent until proven guilty’ (दोष सिद्ध होईपर्यंत निर्दोष) असे म्हणतात. हे विधेयक कोर्टाच्या निर्णयाआधीच एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवून त्याचे पद काढून घेत आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
तपास संस्थांचा गैरवापर: विरोधकांना सर्वात मोठी भीती ही आहे की सत्ताधारी पक्ष सीबीआय (CBI), ईडी (ED) किंवा इतर तपास संस्थांचा गैरवापर करून त्यांच्या नेत्यांना खोट्या आरोपांखाली अडकवून तुरुंगात ठेवतील. यामुळे विरोधकांना राजकारणातून बाहेर काढण्याचा हा एक सोपा मार्ग बनू शकतो, असे त्यांना वाटते.
राजकीय बदला (Political Vendetta): हे विधेयक राजकीय सूड उगवण्यासाठी एक शक्तिशाली हत्यार बनू शकते. एखाद्या राज्यात विरोधकांचे सरकार असल्यास, केंद्रातील सत्ताधारी पक्ष आपल्या तपास यंत्रणांच्या मदतीने त्या सरकारला अस्थिर करू शकतो, असा विरोधकांचा आरोप आहे.
लोकशाहीतील मोठा प्रश्न?नैतिकतेचा संघर्ष आणि भविष्यातील आव्हाने
>हा वाद केवळ कायदेशीर नाही तर लोकशाहीच्या मुलभूत प्रश्नाशी जोडलेला आहे >नैतिकतेला प्राधान्य द्यायचे की न्यायालयीन निर्णयाची वाट पहायची? >लोकशाहीची शुचिता राखायची की राजकीय बदला घ्यायचा?
जर विधेयक पास झाले तर देशातील अनेक राज्यसरकारे डळमळीत होऊ शकतात.विरोधकांना वाटत आहे की हे BJP विरोधी नेत्यांना कमकुवत करण्यासाठी वापरले जाईल.पण समर्थक म्हणतात की, यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि राजकीय स्वच्छता वाढेल.“१३० वी घटना-दुरुस्ती विधेयक, २०२५” हे भारताच्या राजकारणातील टर्निंग पॉईंट ठरू शकते.👉 जर हे विधेयक मंजूर झाले, तर देशात स्वच्छ प्रशासन आणि नैतिक राजकारणाची नवी पायरी उभी राहील.
👉 पण त्याचवेळी, जर याचा गैरवापर झाला तर हेच विधेयक लोकशाहीला मोठा धोका ठरू शकते. विरोध विरोधकांना नामोहरण करण्यासाठी हे शस्त्र बनू शकते.
शेवटी, निर्णय संसद आणि नंतर न्यायालय यांच्यावर अवलंबून आहे. पण नक्की एक गोष्ट आहे – हे विधेयक पुढील काही महिन्यांत भारताच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे.









