• About us
  • contact us
  • disclaimer
  • Privacy Policy
  • homepage
Sunday, March 8, 2026
No Result
View All Result
vidhanwarta
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार
vidhanwarta
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार
No Result
View All Result
vidhanwarta
No Result
View All Result

“पावसाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. Leptospirosis पासून बचाव करण्यासाठी योग्य पद्धती जाणून घ्या!”

vidhanwarta by vidhanwarta
24 August 2025
in आरोग्य
0
"Leptospirosis in rain: Preventive measures to stay healthy during monsoon season

"Leptospirosis: पावसात घुसलेला घातक जंतू - पावसाळयातील धोका आणि संरक्षण उपाय"

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Leptospirosis cause Symptoms And Treatment : पावसाळ्याच्या ऋतूमध्ये पाऊस, पावसात जमा होणार पाणी, आजूबाजूच सांडपाणी हे पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर तसेच इतर तत्सम मोठ्या शहरांच्या आरोग्यावर परिणाम करत. अशातच आपल्याला कधी पावसात भिजायला आवडतं किंवा मजबुरी म्हणून पावसात भिजवावे लागत. अशा वातावरणात जंतू हे मोठ्या प्रमाणावर तयार होतात आणि मग त्याचा प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून होतो.

Table of Contents

  • १. Leptospira जंतूची वैशिष्ट्ये
  • २. या जंतूचा माणसाला संसर्ग कसा होतो?
  • ३. Leptospirosis या आजाराचे वेगवेगळे प्रकार
  • 1. Health and Medical Resources:
  • 2. Local Health Resources (India)

      

साथीचे आजार, प्लेग, डेंग्यू ,मलेरिया, साथीचे ज्वर याशिवाय ही मोठ्या शहरांमध्ये लेप्टो म्हणजेच लेप्टोस्पायरोसिस हा एक खूप मोठा साथी सारखा पसरणारा आजार आहे ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो, यातून तुमचा वेळ वाया जातो , तुमच्या कामावर परिणाम होतो, आणि उपचारासाठी आर्थिक नुकसान होतं वेळप्रसंगी काही लोकांसाठी तो जीव घेणा देखील ठरू शकतो. या पसरणाऱ्या आजाराची माहिती असल्यास आपण योग्य उपचार पद्धती अवलंबून होणाऱ्या नुकसानी पासून वाचू शकतो आणि पावसाळ्यामध्ये आपलं एक आरोग्यपूर्ण आयुष्य घालवू शकतो.उपलब्ध वैद्यकीय संदर्भाच्या आधारे याबाबत माहिती करून घेऊया,

लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) – शहरी पूराचा ताप

हा एक बॅक्टेरियल संसर्ग आहे, जो Leptospira नावाच्या जंतूमुळे होतो.हा जंतू प्रामुख्याने उंदरांच्या लघवीतून (Rat urine) पसरतो. आपल्या आजूबाजूला प्राणी अथवा मानवी लघवी मिसळलेले साचलेले पाणी (stagnant water) , रस्त्यावर किंवा गटारात साचलेल्या पाण्यात राहतो आणि त्यातून हा जंतू जिवंत राहतो.पायावरील जखम, खरचटलेले भाग किंवा पायाच्या बोटांमधील त्वचा यांद्वारे हा जंतू शरीरात प्रवेश करतो.

            लेप्टोस्पायरोसिस ही जगभरातील, विशेषतः उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागांमध्ये आढळणारी एक गंभीर आरोग्य समस्या (health problem) आहे.हा रोग लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूंमुळे होतो.हे जीवाणू सामान्यत: संक्रमित प्राण्यांच्या मूत्रामधून दूषित झालेल्या पाणी आणि मातीमध्ये आढळतात.

१. Leptospira जंतूची वैशिष्ट्ये

स्पायरल आकाराचा लेप्टोस्पायरोसिस virus

स्पायरल आकाराचा लेप्टोस्पायरोसिस virus

●हा जंतू स्पायरल आकाराचा (Spiral-shaped bacterium) असतो, त्यामुळे तो पाण्यात बराच काळ जिवंत राहू शकतो.

● प्रामुख्याने हा जंतू उंदरांच्या लघवीतून तो बाहेर पडतो आणि ओलसर, साचलेल्या पाण्यात काही दिवसांपासून  ते काही आठवडे  टिकू शकतो.

२. या जंतूचा माणसाला संसर्ग कसा होतो?

● तुमच्या त्वचेवरील जखमा, खरचटलेली जागा किंवा मऊ भाग (जसे पायाच्या बोटांमधील त्वचा) – हा शरीरात येण्याचा मुख्य मार्ग आहे.

●डोळे, नाक किंवा तोंडाच्या श्लेष्मल झिल्ली (Mucous membranes) यांचा आशा पाण्याची संपर्क आला– थेट पाण्याच्या संपर्कातून प्रवेश करतो.

● शेतकऱ्यांना ग्रामीण भागात हा आजार शेतातील साचलेल्या पाण्यातून होतो, तर शहरांमध्ये रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून होतो.

३. Leptospirosis या आजाराचे वेगवेगळे प्रकार

लेप्टोस्पायरोसिस दोन स्वरूपात दिसतो:

1. हलका (Mild form) – फक्त ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे – ७-१० दिवसांत बरा होतो.

2. गंभीर (Severe form / Weil’s Disease) – यकृत (लिव्हर), मूत्रपिंड (किडनी), फुफ्फुसे (lungs) यांवर परिणाम करतो. मृत्यूदर ५–१५% पर्यंत जाऊ शकतो.

शहरांमध्ये धोका जास्त का?

● शहरात असलेली निकृष्ट ड्रेनेज व्यवस्था – पाणी वाहून न जाता तसंच साचतं.

●रस्त्यांवर पाणी साठणं – पावसाळ्यात खड्डे व नाले पाण्याने भरलेले असतात.

●झोपडपट्ट्या व बांधकाम साईट्स – इथे उंदरांची वस्ती मोठ्या प्रमाणात असते.

●पादत्राणे न वापरणे – बूट/चप्पल न घालता पाण्यातून चालणे.

●ग्रामीण भागात पाणी बहुधा वाहून जाते, पण शहरांत ते साचते, आणि तिथे Leptospira वाढतो.

लेप्टोस्पायरोसिसचा कोणत्या लोकांना धोका जास्त?

●पावसाळ्यात स्लम एरियात राहणारे लोक.

●बांधकाम मजूर आणि कामगार, त्यांच्या कामाच्या आजूबाजूला साचलेलं पाणी खूप असतं.

●ड्रेनेज साफ करणारे कामगार (Sewage workers)

●पावसात खेळणारी लहान मुले (पाय अनवाणी भिजतात)

●पाळीव प्राण्यांशी सतत संपर्कात राहणारे लोक

लागण ओळखण्यासाठी सुरुवातीची लक्षणे (१–३ दिवसांत):

1.हळुहळु ताप येतो व अंग जड पडुन दुखायला लागत आणि खुप सारा थकवा जानवायला लागत.

2. सतत डोकेदुखी जाणवायला लागते.

3. अंगातील ताप , जडपडलेल अंग यामुळे डोळे लालसर (Conjunctival suffusion) होणे

4. तुम्हाला खाललेल पचन कठीण जात, उलटी व पोटदुखी चा त्रास जाणवतो.

लेप्टोस्पायरोसिसच्या उद्भवणाऱ्या आजाराची गंभीर लक्षणे (३–५ दिवसांत):

*डोळे व त्वचा पिवळी पडणे (Jaundice)

*लघवी कमी होणे किंवा बंद होणे (Acute Kidney Injury)

*श्वास घेण्यास त्रास (Respiratory Distress)

*मानसिक गोंधळ, रक्तस्त्राव (Weil’s Disease)   

           या टप्प्यावर असे लक्षण दिसल्यास रुग्णाला तातडीने ICU मध्ये दाखल करणे आवश्यक असते.

लेप्टोस्पायरोसिसच निदान (Diagnosis) कसं होतं?

1.PCR (Polymerase Chain Reaction) – जंतूचा DNA शोधणारी तपासणी.

2.IgM ELISA – संसर्गावरील प्रतिपिंडे (Antibodies) तपासते.

3.MAT (Microscopic Agglutination Test) – जुनी पण विश्वसनीय पद्धत

या आजारावर उपलब्ध असलेले उपचार (Treatment)

अ.अँटिबायोटिक्स : Doxycycline किंवा Penicillin G यांचा वापर डॉक्टर रुग्णाच्या लक्षणांचं स्वरूप आणि त्याची सध्याची परिस्थिती हे बघूनच करतात.

ब.या आजाराची बाधा झालेल्या व्यक्तीस वरवेळेवर उपचार सुरू केल्यास रुग्ण ७–१० दिवसांत पूर्ण बरा होतो.

Leptospirosis साठी लसीकरण (Vaccination) आहे काय ?

● सध्या या जंतूच्या प्रसारावरती नियंत्रण आणण्यासाठी काही देशांमध्ये (जसे क्यूबा, फ्रान्स, चीन) Leptospirosis साठी लस उपलब्ध आहे.

● भारतात सध्या सार्वत्रिक लसीकरण उपलब्ध नाही, पण जोखमीच्या गटातील लोकांसाठी (उदा. मजूर, ड्रेनेज कामगार) काही ठिकाणी ती वापरली जाते.

लागण झालेल्या व्यक्तीस कधी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे?

●जेव्हा एखाद्या व्यक्तीची लघवी पूर्णपणे थांबते.

● हा जंतू शरीरात प्रवेश केल्यानंतर विनाकारण आशा मानसिक गोंधळ नेहमीपेक्षा जास्त व्हायला लागतो.

● अचानकपणे अशा व्यक्तींना श्वसनात अडचण होते/ शरीरामधील  ऑक्सिजन कमी झाल्यानंतर.

● अचानक जास्तीचा रक्तस्त्राव होत असेल आणि तुमच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होत असतील तेव्हा.

 प्रतिबंध (Prevention) कसा करायचा

●”धोका फक्त पाण्यातून नाही, तर तुमच्या पायातून येतो!”

●गमबूट/चप्पल घालूनच साचलेल्या पाण्यातून चालणे.

● भिजलेले कपडे लगेच बदलणे जास्त वेळ शरीरावर ठेवू नये

● नेहमी चांगलं शरीर असताना पेक्षा श्वास घेण्यास त्रास, पिवळी डोळे, ताप अशा प्रकारची लक्षणे अचानक दिसायला लागली– म्हणजे त्वरित डॉक्टरकडे जा!

●पावसाळ्यात विशेषतः झोपडपट्टी, गटाराजवळ व बांधकाम परिसरात जपून राहणे.

● आपल्या जवळपास सांडपाणी जास्तीच जमा होणार नाही याची काळजी घेऊन त्याचा वेळीच निचरा करण्याचा प्रयत्न करणे.

  लक्षात ठेवा

साचलेलं पावसाचं पाणी तुम्हाला फक्त ओलं करत नाही…ते कधी कधी तुमचं जीवनही हिरावून घेऊ शकतं!

महत्त्वाचे संसाधने (resources)

1. Health and Medical Resources:

  • WHO (World Health Organization):
    WHO च्या वेबसाइटवर Leptospirosis संबंधित अद्ययावत माहिती आणि गाइडलाइन्स मिळतील.
    • Leptospirosis – WHO
  • CDC (Centers for Disease Control and Prevention):
    अमेरिकन CDC साइटवरील Leptospirosis बाबतचे माहितीपत्रक.
    • Leptospirosis – CDC
  • National Institute of Health (NIH):
    NIH मध्ये Leptospirosis वर सखोल शोधनिबंध व शोधप्रकाश आहे.
    • Leptospirosis – NIH

2. Local Health Resources (India)

  • National Vector Borne Disease Control Programme (NVBDCP):
    भारतातील मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या जंतूजन्य आजारांसाठी NVBDCP चं मार्गदर्शन उपलब्ध आहे.
    • NVBDCP – Leptospirosis
  • Ministry of Health and Family Welfare:
    भारतीय आरोग्य मंत्रालयाची वेबसाइट जिथे पावसाळ्यातील जंतूजन्य आजार व त्यांचे नियंत्रण याबद्दल माहिती मिळू शकते.
    • Ministry of Health – India

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लेखक हे मागील 15 वर्षांपासुन आरोग्य,कृषी, अर्थकारण,व्यापार, तंत्रज्ञान, क्रीडा, कायद्या या सारख्या विषयांचा विष्लेशक म्हणुन अभ्यास करत आहेत.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X

Like this:

Like Loading...

Related

Tags: LeptospirosisLeptospirosis cause Symptoms And TreatmentLeptospirosis outbreak in citiesLeptospirosis prevention tipsWaterborne diseases in rainलेप्टोस्पायरोसिस म्हणजे काय?

Related Posts

सर्दीमुळे कानाचे आजार आणि बहिरेपणाचा धोका
आरोग्य

सामान्य सर्दीकडे दुर्लक्ष नको; कानांचे आजार आणि बहिरेपणाचा वाढता धोका

5 January 2026
रिकाम्या पोटी ओवा सेवनाचे आरोग्य फायदे
आरोग्य

रिकाम्या पोटी ओवा सेवनाची लोकप्रियता वाढली; आरोग्यतज्ज्ञ म्हणतात—“सोप्या सवयीने मोठे फायदे”

15 November 2025
ऋतू बदलताच आजारी का पडतो?
आरोग्य

ऋतू बदलताच आजारी का पडतो? या ‘या’ चुका टाळा आणि इम्यूनिटी वाढवा!

10 November 2025

Sip calculator

SIP Calculator Widget

SIP Calculator

Invested Amount
Est. Returns
Total Value

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Age calculator

Age Calculator Widget

Age Calculator

Your calculated age will appear here.
ऋतू बदलताच आजारी का पडतो?

ऋतू बदलताच आजारी का पडतो? या ‘या’ चुका टाळा आणि इम्यूनिटी वाढवा!

by vidhanwarta
10 November 2025
0

ऋतू बदलताच आजारी का पडतो? प्रत्येक ऋतू बदलाच्या वेळी अनेकांना सर्दी, खोकला, ताप किंवा ॲलर्जीचा त्रास होतो. उन्हाळा संपून पावसाळा...

NABARD Recruitment 2025 :

NABARD Recruitment 2025:  नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया ८ नोव्हेंबरपासून सुरू

by vidhanwarta
6 November 2025
0

NABARD Recruitment 2025 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) ने असिस्टंट मॅनेजर (ग्रेड अ) भरती २०२५ साठी एक संक्षिप्त...

shivsena vs bjp शिंदे गट विरुद्ध भाजप – रवींद्र चव्हाण वादामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष

Shivsena vs Bjp:शिंदे गटाची खरी नाराजी चव्हाणांवरच? – महायुतीतला अंतर्गत संघर्ष शिगेला! ‘मित्रां’मधील मतभेद चव्हाट्यावर!

by vidhanwarta
18 November 2025
0

Shivsena vs Bjp: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलं आहे. भाजप–शिंदे शिवसेना महायुतीमध्ये 'वरवरची शांतता' आणि 'आतला खदखदणारा संघर्ष' हे...

EPFO pension increase update 2025 – minimum pension ₹5,500

EPFO पेन्शन वाढ: किमान मासिक पेन्शन ₹5,500 पर्यंत वाढण्याची शक्यता!

by vidhanwarta
18 November 2025
0

EPFO पेन्शन वाढ: खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, कारण केंद्र सरकार कर्मचारी निवृत्तीवेतन योजना (EPS) अंतर्गत किमान...

ADVERTISEMENT
निवडणुकीत ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध आणि शांततेचा प्रचार

निवडणुकीचा प्रचार ‘शांत’ वातावरणात! रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक वापरल्यास थेट कारवाई !

by vidhanwarta
13 November 2025
0

restrictions on loudspeaker : नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मात्र,...

यामाहा XSR 155

यामाहा XSR 155 भारतात लॉन्च – किंमत, फीचर्स आणि सविस्तर माहिती निओ-रेट्रो रोडस्टरचा आधुनिक अवतार!

by vidhanwarta
13 November 2025
0

यामाहा XSR 155 : भारतीय मोटरसायकल बाजारात यामाहाने आणखी एक आकर्षक नवा पर्याय सादर केला आहे. कंपनीने आपली लोकप्रिय यामाहा...

  • About us
  • contact us
  • disclaimer
  • Privacy Policy
  • homepage

Copyright © 2025 Vidhanwarta | Design By Webfire Degitech.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार

Copyright © 2025 Vidhanwarta | Design By Webfire Degitech.

%d