Cheteshwar pujara retirement:भारतीय क्रिकेटचा अढळ खांब, संयमाचं प्रतीक आणि टेस्ट क्रिकेटमधील सर्वात विश्वासार्ह चेहरा म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा अखेर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. २४ ऑगस्ट २०२५ रोजी त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून ही घोषणा केली. ही बातमी समोर येताच केवळ भारतीय चाहत्यांमध्येच नाही, तर जगभरातील क्रिकेट मंडळीत भावनिक वातावरण निर्माण झालं.
Table of Contents
राहुल द्रविड नंतर भारतीय संघाची भिंत म्हणून उभा राहिलेला आणि सेना देशात भारतीय फलंदाजीची संरक्षण प्रणाली राहिलेला भारताचा क्रिकेट फलंदाज चेतेश्वर पुजारा याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये पुनरागमनाची कुठलीही संधी दिसत नसल्याने अखेर आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
निवृत्तीची घोषणा – भावनिक सोशल मीडिया पोस्ट
पुजाराने X (पूर्वीचं ट्विटर) वर आपल्या निवृत्तीची घोषणा करत लिहिलं :
“भारतीय जर्सी घालून, राष्ट्रगीत म्हणत मैदानात जाण्याचं भाग्य मला लाभलं, हा माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा सन्मान होता. पण प्रत्येक प्रवासाला एक शेवट असतो. आता कृतज्ञतेने मी सर्व फॉरमॅटच्या क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.”
या काही शब्दांतच पुजाराच्या प्रवासाचा सार दडलेला होता समर्पण, कर्तव्य आणि भारतीय संघासाठीची निष्ठा ही त्याच्या क्रिकेट कारकिर्दीप्रमाणे निवृत्तीच्या संदेशांमध्ये देखील सर्वांना दिसून आली.
भारतीय क्रिकेटमध्ये पुजाराचं योगदान
चेतेश्वर पुजारा हा केवळ खेळाडू नव्हता, तर तो भारतीय टेस्ट क्रिकेटमधला आत्मविश्वास होता. राहुल द्रविडनंतर भारतीय संघाला ज्या खेळाडूची गरज होती, तो पुजारा ठरला. त्याने आपल्या शांत स्वभाव, मजबूत तंत्र आणि अखंड संयमाच्या जोरावर संघाला अनेक कठीण परिस्थितीत वाचवलं. म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमणाच्या वेळी आक्रमण थोपवणे आणि टिकून राहणे पुढे संधी मिळताच प्रतिहल्ला चढवणे ही जी भूमिका आहे ती राहुल द्रविड नंतर पुजाराने समर्थपणे पुढे चालवली.
टेस्ट पदार्पण : २०१० मध्ये बंगलोर टेस्टमधून त्याने करिअरची सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात ७२ धावांची खेळी करून त्याने सर्वांचे लक्ष वेधले.
ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी : २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने पहिल्यांदा टेस्ट मालिका जिंकली. या विजयामध्ये पुजाराचं योगदान अफाट होतं. त्याने मालिकेत ५२१ धावा काढून ‘मॅन ऑफ द सिरीज’ किताब मिळवला. त्याच्या धीरगंभीर फलंदाजीशिवाय हा विजय अशक्य होता.
त्यानंतर 2023 च्या ऑस्ट्रेलिया दौरा दरम्यान अजिंक्य रहाणे च्या नेतृत्वाखाली दिवस रात्र कसोटीत भारतीय संघ 35 धावांमध्ये सर्व बाद झाल्यानंतर पुढे कोणताही संघ गाबा या ठिकाणी कसोटी सामना जिंकला नव्हता हा सामना स्वतःच्या अंगावरती कमिन्स स्टार्क ,हेजलवूड यांचा मारा अंगावर झेलत भारतीय संघाला विजयाचा खाम रोवण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांन बजावली होती. या क्षणाबद्दल ऋषभ पंत ने खास शब्दात आपल्या आठवणींना उजाळा पण दिला आहे.
‘भिंत’नावाची भूमिका : विरोधी संघाचा वेगवान किंवा फिरकी गोलंदाज कितीही आक्रमक असला, तरी पुजारा क्रीजवर असला की भारतीय ड्रेसिंगरूम शांत राहत असे. त्याच्या बॅटिंगमधली खासियत म्हणजे ‘कधीही घाई नाही’ — गोलंदाजांना थकवणं, प्रत्येक चेंडूला सामोरे जाणं आणि नंतर योग्य वेळ साधून धावा जमवणं.
Cheteshwar pujara retirement: करिअरची आकडेवारी
प्रथम-श्रेणी क्रिकेटमधली त्याची २१,३०१ धावांची कमाई ही स्वतःमध्येच इतिहास आहे. रणजीमध्ये तो जवळपास दोन दशकं सतत धावा करत राहिला आणि सौराष्ट्रला अनेक विजय मिळवून दिले.
🏏Cheteshwar pujara retirement– क्रिकेट कारकिर्दीची आकडेवारी
| फॉरमॅट / विभाग | सामने | धावा | सरासरी | शतके | अर्धशतके | सर्वोच्च धावसंख्या | महत्त्वपूर्ण कामगिरी |
|---|---|---|---|---|---|---|---|
| कसोटी (आंतरराष्ट्रीय) | १०३ | ७,१९५ | ४३.६० | १९ | ३५ | २०६* | २०१८-१९ ऑस्ट्रेलिया दौरा – ५२१ धावा, मालिकावीर |
| वनडे (आंतरराष्ट्रीय) | ५ | ५१ | १०.२० | ० | ० | २७ | मर्यादित संधी, कसोटीवर लक्ष केंद्रित |
| प्रथम श्रेणी (घरेलू) | २६०+ | २१,३०१ | ~५१.०० | ६६ | ९०+ | ३०२* | भारतातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अग्रस्थानी |
| लिस्ट A (घरेलू) | १००+ | ४,५००+ | ~४५.०० | ११ | २८+ | १५८ | सौराष्ट्रसाठी सातत्यपूर्ण कामगिरी |
| T20 (घरेलू) | ३०+ | ६००+ | ~२४.०० | ० | २+ | ८६* |
पुजाराच्या निवृत्तीवर दिगज्जांनी दिलेल्या प्रतिक्रिया
पुजाराच्या निवृत्तीची घोषणा होताच क्रिकेटविश्वातून भावनांचा महापूर उसळला.
“भारतीय संघाच्या अवघड प्रसंगी पुजारा नेहमीच भिंत ठरला. त्याचं नाव क्रिकेटच्या इतिहासात सदैव कोरलं जाईल.”- सचिन तेंडुलकर
“तू या खेळाचा एक महान राजदूत राहिलास. भारतीय क्रिकेटसाठी तुझं योगदान अमूल्य आहे.”- अनिल कुंबळे
“पुजारा म्हणजे संयमाचा पर्याय. त्याचं खेळाप्रती असलेलं प्रेम अप्रतिम आहे.”- युवराज सिंग
“अशा खेळाडूला सन्माननीय निरोप मिळायला हवा होता. त्याला फेअरवेल मॅच न मिळणं ही भारतीय क्रिकेटसाठी खेदाची बाब आहे.”- शशि थरूर
आर. अश्विन, गौतम गंबीर, लक्ष्मण अशा दिग्गजांनीदेखील भावनिक संदेश दिले.या प्रतिक्रिया दाखवतात की पुजारा फक्त खेळाडूच नव्हता, तर सहकाऱ्यांचा आणि प्रतिस्पर्ध्यांचा आदर मिळवलेला एक व्यक्तिमत्व होता.
फेअरवेल मॅच – न मिळालेला सन्मान
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक दिग्गजांना शेवटच्या सामन्यात निरोपाचा मान मिळाला. मात्र पुजारा या यादीत नाही. त्याला कोणतीही फेअरवेल टेस्ट खेळण्याची संधी देण्यात आली नाही. हा मुद्दा चाहत्यांना आणि माजी खेळाडूंना खटकला.भारतीय संघात नवीन खेळाडूंना संधी द्यावी यासाठी त्याला बाहेर बसावं लागलं, पण त्याला निरोपाचा मंच न देणं ही मोठी उणीव ठरली. तरीही चाहत्यांच्या मनात त्याची प्रतिमा ‘अनौपचारिक फेअरवेल’ म्हणून कायम राहील.
पुजाराची शैली
चेतेश्वर पुजारा आजच्या वेगवान क्रिकेटमध्ये वेगळा ठरला. जेव्हा टी-२० संस्कृती धावांचा पाऊस पाडत होती, तेव्हा पुजारा संयम, तंत्र आणि कसोटी क्रिकेटचं महत्त्व आठवण करून देत होता.त्याने दाखवून दिलं की , क्रिकेट फक्त फटकेबाजीचं नाव नाही, तर धैर्य, संयम आणि चिकाटी यांचा संगम असल्याचे पुजाराने आपल्या खेळातुन दाखवुन दिले आहे.हीच एक कसोटी क्रिकेट ची खास पुजारा शैली आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल: देशांतर्गत सामन्यांसाठी नियम अधिक कडक
Cheteshwar pujara retirement:भविष्यातील वाटचाल
निवृत्तीनंतर पुजारा क्रिकेटपासून दूर जाणार नाही. तो आधीच इंग्लंड मालिकेत BBC च्या कॉमेंट्री पॅनेलमध्ये दिसला होता.भविष्यात तो कमेंटेटर आणि विश्लेषक, तरुण खेळाडूंसाठी मार्गदर्शक, प्रशिक्षक किंवा क्रिकेट प्रशासनातील भूमिका या स्वरूपात योगदान देऊ शकतो.
चेतेश्वर पुजारा हा भारतीय क्रिकेटसाठी ‘निशब्द योद्धा’ होता. त्याने कधीही प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न केला नाही, पण त्याच्या धीरगंभीर खेळींनी भारताला अनगिनत विजय मिळवून दिले. त्याचं शांत चेहरा, घामाने भिजलेलं हेल्मेट आणि गोलंदाजांच्या हल्ल्याला थोपवणारी भक्कम फलंदाजी ही प्रत्येक भारतीय चाहत्याला कायम लक्षात राहील.
त्याची निवृत्ती ही एका युगाचा शेवट आहे. पण त्याचं शिकवणं मात्र कायम जिवंत राहील —
“धीराने खेळा, हार मानू नका, आणि संघासाठी नेहमी उभे रहा.”
लेखक हे मागील 15 वर्षांपासुन आरोग्य,कृषी, अर्थकारण,व्यापार, तंत्रज्ञान, क्रीडा, कायद्या या सारख्या विषयांचा विश्लेषक म्हणुन अभ्यास करत आहेत.










Leave a Reply