— आरोग्य सुधारण्यासाठी साखर कमी करणे फायदेशीर, मात्र अचानक सोडल्यास शरीरावर होतो ताण
Table of Contents
Suger reduction health benefit: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण आपल्या आहारातून साखर कमी करण्याचा निर्णय घेत आहेत. वाढते मधुमेहाचे प्रमाण, लठ्ठपणा आणि हृदयरोगाचे वाढते धोके पाहता, साखर कमी करणे ही एक गरजेची आरोग्य सुधारणा बनली आहे. मात्र, साखर एकदम थांबविणे शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून काही अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे ही प्रक्रिया शास्त्रशुद्ध आणि टप्प्याटप्प्याने केली जावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
साखर हा जरी सर्वांचा आवडीचा विषय असला तरी त्यातुन होणारे तोटे हे जसे लक्षात येतात किंवा डॉक्टर आरोग्याबाबतची समस्या निर्माण झाली की सल्ला देतात. त्यामधुन आपण आहारातील साखर कमी करण्याचा निर्णय घेत असतो. हल्ली वाढत्या मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकाराच्या घटनांमुळे अनेक लोक आपल्या आहारातून साखर कमी करण्याचा निर्णय घेत आहेत. मात्र आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की साखर एकदम बंद करण्यापेक्षा हळूहळू व शास्त्रशुद्ध पद्धतीने ती कमी करणेच अधिक सुरक्षित व परिणामकारक ठरते.
संभाजीनगरचे डॉ. विशाल कोठावळे यांना आम्ही साखर कमी करण्या बाबत विचारले असता त्यांनी साखर , आहार आणि हेल्थ यावर सविस्तर माहिती दिली.
Suger reduction health benefit: साखर कमी केल्याचे फायदे (धीराने आणि नियोजनाने केल्यास)
साखर (विशेषतः पांढरी साखर किंवा प्रोसेस्ड साखर) हळूहळू कमी केल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात साखर (विशेषतः प्रोसेस्ड किंवा पांढरी साखर) हळूहळू कमी केल्यास अनेक सकारात्मक परिणाम दिसतात. यामध्ये सर्वांत मोठा फायदा म्हणजे उर्जा स्थिर राहते, डोक्यावर चढणारी थकवा आणि ब्रेन फॉग कमी होतो, वजन कमी होते, त्वचा सुधारते आणि झोपेचा दर्जाही चांगला राहतो. इतकेच नव्हे तर मधुमेह, हृदयरोग आणि फॅटी लिव्हर यांसारख्या आजारांचा धोका देखील कमी होतो.
| फायदे | स्पष्टीकरण |
| उर्जा स्तरात सुधारणा | साखरेचे उतार-चढाव टळतात; शरीर अधिक स्थिर आणि सुसंगत पद्धतीने ऊर्जा वापरते. |
| मूड व मेंदू कार्य सुधारते | “ब्रेन फॉग” किंवा चिडचिडेपणा कमी होतो. |
| ⚖वजन घटते | साखर ही रिकामी कॅलोरी असते – ती कमी केली की वजनात घट दिसते. |
| हृदय व मधुमेहाचा धोका कमी होतो | टाईप 2 डायबिटीज, हृदयरोग, फॅटी लिव्हर यांचे धोके घटतात. |
| त्वचेचा तजेला वाढतो | साखरेमुळे होणारी त्वचेतील दाहत्मकता (inflammation) कमी होते. |
| झोप सुधारते | रक्तातील साखरेचे चढ-उतार झोपेवर परिणाम करतात, ते कमी हो |
साखर अचानक बंद केल्याचे तोटे (Sugar Withdrawal Symptoms)

जर तुम्ही साखर एकदमच बंद केली, विशेषतः जर आधी जास्त घेत असाल, तर काही दिवस हे त्रास जाणवू शकतात.जर ही साखर अचानक बंद केली गेली, तर शरीराला आणि मेंदूला त्याचा ताण बसतो. त्यातून “साखर विथड्रॉवल” सारखी लक्षणे दिसू शकतात. यात डोकेदुखी, थकवा, चिडचिड, मूड स्विंग्स, तीव्र साखरेची तल्लफ, झोपेचा त्रास आणि काही वेळा पचनाच्या तक्रारी देखील होऊ शकतात. ही लक्षणे सामान्यतः ३ ते १० दिवस टिकतात आणि शरीर साखरेशिवाय जगायला शिकल्यावर ती कमी होतात.
| त्रास | स्पष्टीकरण |
| डोकेदुखी | सुरुवातीचे सामान्य लक्षण. |
| थकवा / कमजोरी | शरीर नवीन ऊर्जा स्रोत शोधत असतो. |
| चिडचिडेपणा, मूड स्विंग्स | डोपामिनचे प्रमाण साखरेमुळे वाढते – त्याची कमतरता जाणवते. |
| साखरेची तीव्र तल्लफ | मेंदू साखरेची मागणी करतो. |
| झोपेचा त्रास | विशेषतः पहिल्या काही रात्रींमध्ये. |
| पचनाच्या तक्रारी | सूज, गॅस, अस्थिर जठरसंस्थान. |
| ‘साखर फ्लू‘ सारखी लक्षणं | दुर्मीळ पण शक्य असतात (अंगदुखी, थकवा, सुस्ती). |
हे लक्षणे सहसा 3 ते 10 दिवसांपर्यंत टिकतात आणि नंतर हळूहळू कमी होतात.
साखर कमी करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. एकदम बंद न करता हळूहळू कमी करणे, प्रोटीन व फायबरयुक्त आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, नियमित व्यायाम करणे आणि साखरेचे लपलेले स्रोत (जसे की सॉस, बिस्किट, ब्रेड) ओळखणे हे टप्पे महत्त्वाचे आहेत. कृत्रिम स्वीटनर टाळावेत, कारण तेही मेंदूला साखरेची आठवण करून देतात.
हे पण वाचा :सकाळची सर्वात मोठी चूक! 8 पैकी 7 लोक करतात, तुम्हीही करता का?
आहारातील साखर कमी करण्याचे १० प्रभावी उपाय
आजकाल वाढत्या मधुमेह, लठ्ठपणा व हृदयरोगाच्या पार्श्वभूमीवर आहारातील अतिरिक्त साखर कमी करणे अत्यावश्यक झाले आहे. खाली दिलेले १० महत्त्वाचे उपाय तुमच्या आरोग्ययात्रेत उपयुक्त ठरू शकतात:
1. लपलेली साखर ओळखा:
साखर फक्त मिठाईतच नसते! ब्रेड, सॉस, ड्रेसेस, आणि नाश्त्याच्या पदार्थांमध्येही ती लपलेली असते. यासाठी त्या पदार्थांच्या आवरणांवर असलेली घटकपुस्तिका वाचा.त्यात साखर किती टक्के आहे हे पहा आणि साखर टाळा.
2. फूड लेबल वाचा:
साखर अनेक नावांनी येते – सुक्रोज, ग्लुकोज, फ्रक्टोज, कॉर्न सिरप इ. ‘Total sugars’ आणि ‘Added sugars’ वेगवेगळ्या असतात हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जे पदार्थ खरेदी करुन आवडीने खातात.त्यांचे फुड लेबल वाचा म्हणजे साखर आपण किती खातो हे कळेल
3. पेयांचा पुनर्विचार करा:
तुम्ही पीत असलेले सोडा, स्वीटन केलेली कॉफी-टी, आणि जूसमध्ये भरपूर साखर असते. याऐवजी पाणी, हर्बल टी, किंवा फळ घालून इन्फ्यूज केलेले पाणी निवडा म्हणजेच अशा प्रक्रिया केलेल्या पदार्थांत साखर जास्त असते ते लक्षात घेऊन पेयांचा पुनर्विचार करा.
4पूर्ण धान्याचा अवलंब करा:
तुमच्या आहारवर शरीरात किती प्रमाणात साखर जाते हे ठरत. फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, बीया, आणि नैसर्गिक प्रथिनयुक्त अन्न यामध्ये कोणतीही प्रक्रिया केलेली साखर नसते. यांचा आहारात समावेश करा.थोडक्यात पूर्ण धान्य तुम्हाला तुमच्या आहारातील साखर कमी करण्यास मदत करतील.
5स्मार्ट स्नॅक्स निवडा:
आज काल थोडी भुक लागली की आपण स्नॅक्स कडे वळतो.मग त्या बाहेरचे पदार्थच जास्त असतात. आपण आता ठरवलच आहे साखर कमी करायची तर फ्लेवर्ड योगर्ट, बार्स टाळा. त्याऐवजी फळं, बदाम, ग्रीक योगर्ट, उकडलेली अंडी किंवा भाजीपाला निवडा.म्हणजे आपल्या आहारातील साखर कमी होईल
6 घरीच स्वयंपाक करा:
असलेला पैसा आणि बाहेरच्या खान्याचे मोठ्या प्रमाणात असलेले पर्याय यामुळे आपण बाहेर खात असलेल्या पदार्थात किती साखर आहे हे ठरवु किंवा माहित करुन घेऊ शकत नाही. पण घरगुती जेवणात साखरेचे प्रमाण तुम्ही ठरवू शकता. साखर ऐवजी खजूर, सफरचंद पेस्ट, किंवा मसाल्यांचा वापर करा ज्यामुळे तुमची साखरेची गरज कमी होवु शकेल आणि आहारातील साखर पण कमी होईल.
7सॉस व चटण्या तपासा:
केचप, बार्बेक्यू सॉस, सॅलड ड्रेसिंग यामध्येही साखर असते. घरात हेच आपण चव आणण्यासाठी वापर करत असतो मात्र यात असलेले जास्तीचे साखरेचे प्रमाण आपल्याला माहिती नसते किंवा आपण त्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे शक्यतो घरच्या घरी तयार करा किंवा “No Added Sugar” पर्याय निवडा.
8 हळूहळू साखर कमी करा:
साखर पूर्णपणे अचानक बंद करणं अनेकदा कठीण जातं आणि त्यामुळे शरीरावर व मानसिकतेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे साखर कमी करण्याचा टप्प्याटप्प्याने केलेला प्रयत्न अधिक परिणामकारक आणि टिकाऊ ठरतो.हळूहळू साखरेवरची सवय कमी होते. एकदा चव सवय झाली की, पुन्हा साखरेचा ओवरडोस नकोसा वाटतो
9 साखरेच्या तल्लफीवर नियंत्रण:
साखरेच्या तल्लफीवर (cravings) नियंत्रण मिळवणं हे थोडं कठीण वाटू शकतं, पण शक्य आहे — विशेषतः जर आपण त्यामागची कारणं आणि उपाय नीट समजून घेतले,पाणी प्या, नियमित जेवा, झोप पूर्ण घ्या, आणि भावनिक खाण्याचे टाळा. साखरेची इच्छा मूळतः भूक किंवा ताणामुळे होते. कंटाळा, ताण, भावना — साखर अनेकदा मूड सुधारण्यासाठी खाल्ली जाते. यावर वेगळे मार्ग शोधा (व्यायाम, ध्यान, फिरायला जाणं).
10 दीर्घकालीन फायदे:
साखर कमी केल्याचे दीर्घकालीन फायदे अनेक पातळ्यांवर दिसून येतात — शारीरिक, मानसिक आणि सौंदर्यदृष्ट्याही. साखर कमी केल्यामुळे वजन नियमन, उर्जा वाढ, मधुमेह व हृदयरोगाचा धोका कमी होतो. मूड स्थिर राहतो आणि त्वचा चमकदार होते.साखरेचे उतार-चढाव मस्तिष्काच्या केमिकल्सवर परिणाम करतात – त्यामुळे चिडचिड, नैराश्य किंवा तणाव वाटू शकतो.साखर कमी केल्यावर मूड अधिक स्थिर आणि सकारात्मक राहतो.काही अभ्यासांनुसार साखरेचं अति सेवन लक्ष, स्मरणशक्ती आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम करतं.साखर कमी केल्यास स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता वाढते.
डॉक्टर काय सांतात?
“भारतीय आहार साखरेने भरलेला आहे. साखर हळूहळू कमी केली, तर शरीराला धक्का न बसता आरोग्य सुधारते. टाईप 2 डायबिटीजचं प्रमाण घटवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे.”- डॉ. नितीन गाडगीळ (मधुमेहतज्ज्ञ – मुंबई)
“लोक फक्त मिठाई साखर म्हणून पाहतात. पण बिस्किट, सॉस, ब्रेड यामध्येही साखर लपलेली असते. लपलेली साखर ओळखणे आणि ते टाळणे हे पहिले पाऊल आहे.”-डॉ. राधिका सोमण (न्युट्रिशनिस्ट – पुणे)
“Sugar Detox म्हणजे फक्त बंदी नव्हे. ती एक मानसिक व शारीरिक सवय मोडण्याची प्रक्रिया आहे. योग्य पर्याय आणि संयम गरजेचा आहे.”- डॉ. रणदीप गुप्ता (AIIMS – दिल्ली)
साखर कमी करणं म्हणजे केवळ आहार बदलणं नव्हे – ती एक आरोग्यदायी सवय अंगीकारण्याची प्रक्रिया आहे. जर ही सवय योग्य पद्धतीने आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अंगीकारली गेली, तर ती दीर्घकालीन लाभदायक ठरते. साखर कमी करताना संयम, माहिती आणि शिस्त आवश्यक आहे. त्यामुळे साखर कमी करायची असेल, तर ती हळूहळू आणि विचारपूर्वकच करावी – हीच डॉक्टरांची आणि आहारतज्ज्ञांची शिफारस आहे.
साखर कमी करण्याबाबत ६ सामान्य प्रश्न (FAQs):
1. मी दररोज किती साखर घेणं सुरक्षित आहे?
➡️ WHO च्या मार्गदर्शक तत्वांनुसार, एका प्रौढ व्यक्तीने रोजच्या एकूण उर्जेच्या ५% पेक्षा जास्त साखर घेऊ नये. म्हणजेच सुमारे २५ ग्रॅम (६ चमचे) पर्यंत साखर ही मर्यादा मानली जाते.
2. साखर पूर्णपणे बंद करणं आवश्यक आहे का?
➡नाही. नैसर्गिक साखर (जशी की फळांमधील फ्रुक्टोज) ही शरीरासाठी उपयुक्त असते. फक्त प्रोसेस्ड आणि अतिरिक्त साखरेचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे.
3. साखर कमी केल्यावर सुरुवातीला भूक जास्त का लागते?
➡ साखर कमी झाल्यावर शरीर नैसर्गिकरित्या इन्सुलिन आणि डोपामिनच्या पातळीशी जुळवून घेतं. यामुळे काही काळ भूक, क्रेव्हिंग्स वाढू शकतात – परंतु योग्य आहार, प्रोटीन आणि फायबरमुळे ती नियंत्रित करता येते.
4. साखरेचे लपलेले स्रोत कोणते असतात?
➡ बिस्किट्स, ब्रेड, सॉस, पॅकबंद सूप्स, दही, ग्रॅनोलास, लो-फॅट प्रॉडक्ट्स यामध्ये साखर “फ्रुक्टोज”, “हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप”, “ग्लुकोज”, “माल्टोज” अशा नावांनी लपलेली असते.
5. साखर craving कमी करण्यासाठी काय खावे?
➡ ड्रायफ्रूट्स (खजूर, अक्रोड), ताज्या फळांचा तुकडा, डार्क चॉकलेट (७०% पेक्षा जास्त कोको), लिंबूपाणी (साखर नसलेलं), नाचणी लाडू इ. हे साखरेची तल्लफ कमी करू शकतात.
6. साखर कमी केल्याने त्वचेला खरंच फायदा होतो का?
➡ होय. साखर त्वचेमध्ये “ग्लायकेशन” नावाचा प्रोसेस वाढवते, ज्यामुळे त्वचेत सूज, मुरूम आणि वृद्धत्वाची लक्षणं लवकर दिसतात. साखर कमी केल्यावर त्वचा तजेलदार आणि स्वच्छ वाटते.
related video :










Leave a Reply