Weightlifting mirabai returns:टोकियो ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानू हिने तब्बल एका वर्षाच्या विश्रांतीनंतर अहमदाबाद गुजरात येथे 25 व 26 ऑगस्ट 2025 दरम्यान सुरू असलेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावत भव्य पुनरागमन केले. केवळ सुवर्णपदकच नाही तर तिने स्नॅच, क्लीन अँड जर्क तसेच एकूण वजन या तिन्ही प्रकारांत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. दुखापती नंतर केलेलं पुनरागमन हे चांगलंच सोनेरी आणि विक्रमाचं आहे.
ग्लासगो राष्ट्रकुल खेळ 2026 साठी थेट पात्र
दुखापतीमुळे घ्याव्या लागलेल्या विश्रांतीनंतर तब्बल एक वर्षाच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करत असताना 193 किलो वजन उचलत 48 किलो वजन गटात जिंकलेल्या सुवर्णपदकासह 2026 सालामध्ये ग्लासगो येथे होत असलेल्या राष्ट्रकुल खेळासाठी थेट पात्रता मिळवली आहे.
मीराबाईची विक्रम मोडणारी कामगिरी
कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये अहमदाबाद येथे सुरू असलेल्या 48 किलो वजनी गटामध्ये मीराबाई चानू ने एकूण 193 किलो वजन उचलले असून त्यात स्नॅच प्रकारात 84 किलो वजन, क्लीन अँड क्लीन अँड जर्क प्रकारामध्ये 109 किलो वजन उचललेले आहे या तीनही कामगिरींमुळे मीराबाईने कॉमनवेल्थ स्पर्धेचे विक्रम मोडले आणि महिला 48 किग्रॅ गटात सुवर्ण पटकावले.या सुवर्ण पदाने तिने आपलं विक्रमासह दणक्यात पुनरागमन केलं आहे. या सुवर्णपदकासह तीने 48 किलो वजनी गटातील संपूर्ण क्रीडा प्रकाराचे विक्रम मोडले आहेत.
Weightlifting mirabai returns: पुनरागमना मागची जिद्द
पॅरिस ऑलिंपिक 2024 नंतर मीराबाईने कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली नव्हती. त्यामुळे हा विजय तिच्यासाठी विशेष ठरला. वयाच्या 31 व्या वर्षी तिला 49 किग्रॅ श्रेणी रद्द झाल्याने पुन्हा 48 किग्रॅ गटात उतरावे लागले, आणि यासाठी वजन कमी करणे ही मोठी कसोटी होती.तिच्या शब्दांत – “फक्त 1 किग्रॅ वजन कमी करणेही किती कठीण असते, हे मी अनुभवले.”
वेटलिफ्टिंग ची तांत्रिक कसोटी व संयम
स्पर्धेत तिची कामगिरी टप्प्याटप्प्याने अशी झाली :
●पहिल्या स्नॅच प्रयत्नात अपयश, पण दुसऱ्या प्रयत्नात 84 किग्रॅ यशस्वी.
●क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्याच प्रयत्नात 105 किग्रॅ, नंतर 109 किग्रॅ सहज पार.
●113 किग्रॅ उचलण्याचा प्रयत्न तांत्रिक कारणांमुळे ग्राह्य धरला गेला नाही, मात्र तो आवश्यक नव्हता कारण ती आधीच मोठ्या फरकाने आघाडीवर होती.
तिच्या प्रतिस्पर्धींपैकी मलेशियाची आयरीन हेन्रीने 161 किग्रॅ आणि वेल्सच्या निकोल रॉबर्ट्सने 150 किग्रॅ इतकेच वजन उचलले. त्यामुळे मीराबाईची श्रेष्ठता अधिक अधोरेखित झाली. तिच्या आणि आयरिनच्या वजनातील फरक लक्षात घेता स्वतःचं प्रभुत्व तिने या खेळामध्ये अधुरक्षित केला आहे.
मीराबाईचं पुढचं लक्ष
हा सुवर्ण विजय केवळ पुनरागमनाचे प्रतीक नसून आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तयारीचे व्यासपीठ ठरला आहे. तिच्या प्रशिक्षकां च्या म्हणण्यानुसार नुसार मीराबाईचं पुढील लक्ष्य म्हणजे 200 किग्रॅ एकूण वजन गाठणे.याच कामगिरीमुळे ती थेट ग्लासगो येथे होणाऱ्या 2026 च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी पात्र ठरली आहे.
Cheteshwar pujara retirement: भारतीय क्रिकेटची संयमी ‘भिंत’ अखेर निवृत्त
प्रेरणादायी प्रवास
लहानपणी घरात लाकूडफाटा उचलण्यापासून ते ऑलिंपिक पदक आणि आता पुन्हा विक्रम मोडत सुवर्णपदकापर्यंत – मीराबाई चानूचा प्रवास जिद्दीचा आदर्श आहे. जखमा, अपयश, वजन कमी करण्याची झुंज यावर मात करून तिने पुन्हा एकदा दाखवून दिले की जिद्द आणि चिकाटीने प्रत्येक गोष्ट शक्य आहे.
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने 48 किलो वजनी गट हटवला
मीराबाईचा आता सध्या 49 किलोग्रॅम वजनी गट हा खेळाचा वजनी गट होता परंतु आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन ने हा वजनी गट हटवल्याने मीराबाईने पुन्हा 48 किलो वजनी गटामध्ये खेळण्यास सुरुवात केलेली आहे. या वजनी गटात तिने 2018 मध्ये शेवटचं सामने खेळलेली होती त्यानंतर ती 49 किलोग्राम गटामध्ये खेळत होती. या अगोदर ती 48 किलो वजनी गटाची विश्वविजेता राहिलेली आहे.
मीराबाई चानूचे हे पुनरागमन केवळ सुवर्णपदकापुरते मर्यादित नाही, तर ते तिच्या अढळ जिद्दीचे आणि परिश्रमाचे प्रतीक आहे. सोबतच भारताच्या ऑलिम्पिक तयारीसाठी आणि कॉमनवेल्थ 2026 च्या वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारातील तयारीच्या दृष्टीने हीच पुनरागमन महत्त्वाचं असणार आहे.










Leave a Reply