
मुंबई रणजी संघाचा युवा खेळाडू आयुष म्हात्रेने(Ayush mhatre) कर्णधार म्हणून भारताच्या INDU19 संघाचे नेतृत्व करत वेगवान वादळी शतक करत अंडर नाईन्टीन दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजयाच्या समीप पोहोचवला होता. भारताचा वरिष्ठ संघ चौथा कसोटी सामन्याचा पहिला दिवस खेळत असताना. INDU19 VS ENGU19 यांच्यामध्ये अंडर 19 दुसऱ्या कसोटी सामना खेळवला गेला यात चौथ्या गावात आयुष म्हात्रेने टी ट्वेंटी चा खेळ दाखवत इंग्लंड संघाने कसोटी क्रिकेटमध्ये प्रस्थापित केलेला buzzball ला चांगलाच तडाखा दिला आहे. चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी 65 धावा आवश्यक असताना खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला आणि हा सामना अन निर्णय अवस्थेत संपला त्यामुळे खराब हवामानामुळे भारताचा विजय हिरावला असंच म्हणावं लागेल.
चेम्सफर्ड येथे 20 ते 23 जुलै च्या दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली होती. ENGU19 पहिल्या डावात सर्व बाद 310 धावा केल्या होत्या.INDU19 संघाने पहिल्या डावात सर्व बाद 279 धावा केल्याने इंग्लंडच्या संघाला थोडी आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात ENGU19 संघाने 5 गडी बाद 324 धावा करत विजयासाठी 365 धावांचं आवाहन ठेवलं होतं. ते आवाहन स्वीकारत केवळ 64 चेंडू मध्ये शतक झळकवत भारताला विजयाच्या जवळ नेऊन पोहोचवला आहे. त्याने बाद होण्यापूर्वी 80 चेंडूत 126 धावा केल्या.पहिल्या डावातही त्याने महत्त्वाचे योगदान देत 80 धावा केल्या होत्या.
वैभव सूर्यवंशी झाला गोल्डन डकचा शिकार!
ENGU19 संघाने ठेवलेला आवाहन पार करताना आयपीएल मध्ये 34 चेंडू शतक झळकवणाऱ्या स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी हा गोल्डन डक चा शिकार झाला. तो ॲलेक्स ग्रीनच्या अप्रतिम चेंडू वरती त्रिफळाचीच झाला. विशेष म्हणजे ॲलेक्स ग्रीन ने वैभव सूर्यवंशीला दोनही डावांमध्ये बाद केला आहे.
दोन कसोटी ची मालिका
INDU19 VS ENGU19 यांच्यात दोन कसोटीची मालिका खेळवली गेली. पहिला कसोटी सामना हा अनिर्णयीत अवस्थेत संपला.दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात इंग्लंड साठी एकांश सिंग याने झळकावलं तर पहिल्या डावात विहान मल्होत्राने शतक झळकवत 120 धावा केल्या त्याला 80 धावा करत दुसऱ्या गावातील शतक वीर आयुष म्हात्रेने चांगली साथ दिली. मात्
सामना व मालिका अनिर्णयीत सुटणार?
दुसऱ्या कसोटीत 365 धावांचा पाठलाग करताना भारताला 22 षटकांमध्ये 65 धावा करायचे बाकी असताना खराब हवामानामुळे तसेच पाऊस असल्याने खेळ थांबवण्यात आला. वातावरणात सुधारणा न झाल्याने उर्वरित खेळ हा रद्द करण्यात आला त्यामुळे हा सामना देखील अनिर्णियीत सुटला असल्याचे पंचांनी घोषित केले . दोन्ही सामने अनिर्णयित असल्याने मालिका देखील अनिर्णयीत राहिली असल्याचे स्पष्ट झाले. एकंदरीत कर्णधार म्हणून शेवटच्या दिवशी विजयाचा रथ खांद्यावर घेऊन वेगवान शतक झळकावून आयुष म्हात्रेने भारताला विजयाच्या जवळ नेऊन ठेवत आपल्या कामगिरीची चुनुक दाखवली मात्र खराब हवामानामुळे भारताच्या समिप असलेला विजय पुन्हा एकदा हिरावून घेतला.








