Asia Cup 2025 :भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून चर्चेत असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटप्रेमींसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चेला उधाण आलं होतं. शुभमन गिल की सूर्यकुमार यादव? हा प्रश्न प्रत्येक चाहत्याला पडला होता. अखेर बीसीसीआयने कर्णधाराच्या नावावर शिक्का मोर्तब केला असून, सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे.
Asia Cup 2025 : कर्णधार पदाबाबतचा गोंधळ संपला
सूर्यकुमार यादव काही महिन्यांपासून दुखापतीमुळे पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. त्यामुळे आशिया कपसाठी तो उपलब्ध असेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात होती. अनेकांनी शुभमन गिल कर्णधार होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र सूर्यकुमारच्या तंदुरुस्तीबाबत सकारात्मक बातमी आल्यानंतर बीसीसीआयने थेट त्यालाच कर्णधार घोषित केले आहे.
आशिया कप 2025 – स्पर्धेचं वेळापत्रक
स्पर्धा दिनांक : 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2025
स्थळ : युएई (UAE)
आशिया कप ही आशियाई क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. नेहमी एकदिवसीय स्वरूपामध्ये खेळली जाणारी ही क्रिकेट स्पर्धा आता यावर्षी t20 स्वरूपामध्ये खेळवली जाणार आहे.2026 च्या विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा एकदिवसीय सामन्या ऐवजी t20 सामन्यामध्ये भरविण्यात येत असल्याची क्रिकेट तज्ञांकडून माहिती देण्यात येत आहे.
आशिया कप 2025 – स्पर्धेतील महत्त्वाचे बदल
या वर्षीचा आशिया कप नेहमीपेक्षा वेगळा असणार आहे.
T20 फॉरमॅट: ही स्पर्धा एकदिवसीय सामन्यांऐवजी T20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाची तयारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.हे बदल टीम इंडियासाठी 2026 च्या विश्वचषकापूर्वी आपल्या टी-20 संघाची आणि रणनीतीची चाचपणी करण्याची एक उत्तम संधी आहे.
सूर्यकुमार तंदुरुस्त, सराव सुरु
सध्या सूर्यकुमार यादव पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून, त्याने नॅशनल क्रिकेट अकादमीत सराव सुरु केला आहे. काही दिवसांत बीसीसीआय अधिकृत वैद्यकीय अहवाल जाहीर करणार आहे. त्यानंतर टीम इंडियाची अंतिम निवड जाहीर होईल.
आशिया स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, 19 किंवा 20 ऑगस्ट रोजी बीसीसीआय 2025 च्या आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. भारत गेल्या एक वर्षापासून टी-20 मध्ये वेगळ्या संघासोबत खेळत आहे. काही खेळाडूंनी त्यात चांगली कामगिरी देखील केली आहे. अशा परिस्थितीत, भारतीय व्यवस्थापन गेल्या एक वर्षात भारतासाठी टी-२० क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंवर विश्वास दाखवू शकते.
भारतीय संघाची संभाव्य 15 जणांची यादी
अभिषेक शर्मा,संजू सॅमसन (यष्टीरक्षक),सूर्यकुमार यादव (कर्णधार) हार्दिक पंड्या,श्रेयस अय्यर,रिंकू सिंग,अक्षर पटेल (उपकर्णधार),तिलक वर्मा,जितेश शर्मा (यष्टीरक्षक),कुलदीप यादव,वरुण चक्रवर्ती,वॉशिंग्टन सुंदर,अर्शदीप सिंग,हर्षित राणा,जसप्रीत बुमराह
या नावाव्यतिरिक्तही सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेला भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि आयपीएल गाजवणारा त्याचा सलामीचा साथीदार साई सुदर्शन यांच्या नावाचा देखील भारतीय निवड समितीकडून विचार केला जाऊ शकतो.
भविष्यातील कर्णधारपदाबाबत चर्चा
क्रिकेट वर्तुळात अशी चर्चा आहे की, 2026 च्या टी-20 विश्वचषकानंतर शुभमन गिलला कर्णधारपदाची संधी दिली जाईल. पण सध्या मात्र सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
चाहत्यांची उत्सुकता शिगेला
या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. अनेक चाहते सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया कप जिंकू शकेल, असा विश्वास व्यक्त करत आहेत. दुसरीकडे काही चाहते गिलला लवकरच कर्णधारपद मिळेल याची खात्री व्यक्त करत आहेत.
https://x.com/rread more at :https://x.com/republic/status/1956659358554886508
2025 च्या आशिया कपसाठी भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादववर सोपवण्यात आली आहे. हा निर्णय केवळ संघासाठीच नव्हे, तर भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठीही महत्त्वाचा आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुन्हा एकदा आशिया कपचं विजेतेपद पटकावेल, अशी सर्व चाहत्यांची अपेक्षा आहे.आता सर्वांच्या नजरा 19-20 ऑगस्टकडे लागल्या आहेत, जेव्हा बीसीसीआय अंतिम 15 जणांचा संघ जाहीर करेल. तेव्हा कोणाला संधी मिळते आणि कोणाला वगळलं जातं, हे पाहणंही तितकंच रोमांचक ठरणार आहे.









