
Fide womens world cup 2025:मागील काही काळ हा भारताच्या बुद्धिबळ विश्वाचं सुवर्णयुगच म्हणता येईल. गुकेशने चे सध्याचा बादशाह कार्लसन याचा पराभव, मागील तीन ते चार वर्षात महत्त्वाच्या चेस स्पर्धांवरती राखलेलं वर्चस्व यानंतर ५ जुलै ते २९ जुलै २०२५ या कालावधी दरम्यान फिडे महिलांचा विश्वचषक 2025(Fide womens world cup 2025) बाटुमी जॉर्जिया येथे खेळवला जात असून तिथे या खेळाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा क्षण येतो आहे जिथे भारतीय महिला अंतिम फेरीत पोहोचलेल्या असून अंतिम सामना हा दोन भारतीय महिलांमध्ये होणार आहे.महाराष्ट्राची कन्या 19 वर्षीय दिव्या देशमुख आणि महिला ग्रँडमस्टर 38 वर्षीय कोनेरू हम्पी या दोघी अंतिम सामन्यांमध्ये विश्वविजेता होण्यासाठी एकमेकाही समोर उभ्या असणार आहेत.
काय असणार या सामन्याचं स्वरूप?
७ फेरींचा नॉकआउट प्रकार. प्रत्येक फेरीत २ क्लासिकल सामने आणि तिसऱ्या दिवशी गरज असल्यास टायब्रेकर (रॅपिड/ब्लिट्झ)
या स्पर्धेतील या सामन्यातील दोन्ही स्पर्धकांसाठी विश्रांतीचा दिवस असणार असून 26 जुलैला या स्पर्धेतला पहिला अंतिम सामना व 27 जुलैला दुसरा अंतिम सामना असणार आहे. या स्पर्धेतील नियमाप्रमाणे या दोन्ही सामन्यातील दोनही खेळाडूंचा गुणफलक सारखा झाल्यास 28 जुलैला टायब्रेकर सामना खेळवला (प्रत्येक राऊंडमध्ये दोन्ही खेळाडूंना एकदा पांढऱ्या व एकदा काळा मोहरा वापरून सामने खेळता येईल) जाईल.25 जुलै रोजीया स्पर्धेतील या सामन्यातील दोन्ही स्पर्धकांसाठी विश्रांतीचा दिवस असणार असून 26 जुलैला या स्पर्धेतला पहिला अंतिम सामना व 27 जुलैला दुसरा अंतिम सामना असणार आहे. या स्पर्धेतील नियमाप्रमाणे या दोन्ही सामन्यातील दोनही खेळाडूंचा गुणफलक सारखा झाल्यास 28 जुलैला टायब्रेकर सामना खेळवला (प्रत्येक राऊंडमध्ये दोन्ही खेळाडूंना एकदा पांढऱ्या व एकदा काळा मोहरा वापरून सामने खेळता येईल) जाईल.
स्पर्धा कशी खेळवली जाते महत्त्वाचे नियम:
टायब्रेकर प्रकार:1. क्लासिकल: ९० मिनिटे + ३० मिनिटे + प्रत्येक चालीनंतर ३० सेकंद
2. जर सामना बरोबरीत:२ सामने: १५ मिनिटे + १० सेकंद २ सामने: १० मिनिटे + १० सेकंद२ सामने: ५ मिनिटे + ३ सेकंद शेवटी sudden death: ३ मिनिटे + २ सेकंद
भारतीय महिला खेळाडूंची दमदार कामगिरी
दिव्या देशमुख:महिला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिलास्पर्धेदरम्यान आपला पहिला ग्रँडमास्टर (GM) नॉर्म पूर्ण केला.
कोनेरू हम्पी तर मागील कित्येक वर्ष या खेळात आपला दबदबा राखून आहे मात्र या व्यतिरिक्त व्यतिरिक्त द्रोणावल्ली हरिका,वैशाली रमेशबाबू, प्रियंका के या सर्वांनीच अंतिम फेऱ्यांमध्ये पोहोचून भारतीय बुद्धिबळाची ताकद दाखवली आहे.
या स्पर्धेचे महत्त्व
-या स्पर्धेच्या विजेत्यांना $50000 च बक्षीस दिल जाणार आहे. एकूण बक्षीस निधी हा $691,250 इतक्या रक्कमेचा असणार आहे.
-या स्पर्धेतील वरचे तीन खेळाडू महिला कँडिडेट्स स्पर्धा 2026 साठी पात्र ठरतात, जी जागतिक विजेतेपदासाठी आवश्यक पायरी आहे.
– जागतिक विजेतेपदाची वाट: कँडिडेट्स स्पर्धेमध्ये पोहोचण्यासाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे.
Battle of generatios ?
जागतिक पटलावरती नेहमीप्रमाणे होणारी ही एक महत्त्वाची स्पर्धा जरी असली तरी भारताच्या दृष्टीने ही एक बॅटल ऑफ जनरेशन आहे कारण दिव्या देशमुख हीच वय कोनेरू हम्पीच्या वयाच्या निम्म आहे. त्यामुळे ही एक बॅटल ऑफ जनरेशन असणार आहे विशेष म्हणजे दोघींनीही चिनी खेळाडूंना नमवुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवलेला आहे. दिव्या देशमुख ने माजी विश्वविजेती चीनची तान झोंगयी ला हरवुन अंतिम फेरी गाठली. कोनेरू हंम्पीने चीनच्या लिटिंग जी हिच्याबरोबरचा क्लासिकल सामना हा बरोबरीत सुटल्यानंतर टायब्रेकर सामन्यांमध्ये विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे.
या विश्वचषकाची अंतिम फेरी बरोबरीत सुटली काय? दोघीपैकी कोणी जिंकलं काय शेवटी गुलाल आपलाच असणार आहे त्यामुळे हा अंतिम सामना भारतासाठी सुवर्णवेधच असणार आहे.
- सामान्य सर्दीकडे दुर्लक्ष नको; कानांचे आजार आणि बहिरेपणाचा वाढता धोका
- पिक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय !
- प्राथमिक शिक्षक आठवड्यातून एक दिवस अंगणवाडीत शिकवणार !चिमुकल्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय
- Aadhaar pan link deadline 2025 rules:सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत आधार-पॅन लिंक न केल्यास तुमचे आर्थिक व्यवहार ठप्प होऊ शकतात; जाणून घ्या सविस्तर नियम
- MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२६ ची जाहिरात प्रसिद्ध; ८७ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू








