Heart disease हृदय हा शरीराचा महत्त्वाचा भाग असतो आज प्रत्येकाच्या काळजीचा विषय झालेला आहे.जेव्हा एखाद्या व्यक्तीचं हृदय कमकुवत होतं (LVEF ४५% पेक्षा कमी असते), म्हणजेच LVEF (Left Ventricular Ejection Fraction) 45% पेक्षा खाली जाते, तेव्हा रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही आणि थकवा, श्वास लागणे, पाय सुजणे अशा समस्या उद्भवतात. अशावेळी अशा अवस्थेमध्ये दररोजची घरगुती काळजी अत्यंत महत्त्वाची असते.या अवस्थेतील रुग्णांसाठी घरगुती काळजी घेणे आणि कार्डिअॅक रिहॅब प्रोग्राममध्ये सहभाग घेणे अत्यावश्यक आहे.
Table of Contents

Heart disease- LVEF < 45% दररोजची घरगुती काळजी
१. दररोज वजन तपासणे:वजन अचानक २-३ दिवसांत २ किलोने वाढल्यास, ही हृदयाच्या पाण्याच्या साठ्यामुळे झालेली सूज असू शकते. अशा वेळी डॉक्टरांशी तात्काळ संपर्क साधावा.
२. रक्तदाब आणि नाडी मोजणे:रोज सकाळी रक्तदाब आणि नाडी यांचे मापन करा. खूपच कमी किंवा जास्त असल्यास डॉक्टरांना कळवा.
३. वेळेवर औषध घेणे:डॉक्टरांनी सांगितलेली औषधं वेळेवर आणि नियमित घ्या. डोस चुकल्यास त्रास वाढू शकतो.
४. मीठ आणि पाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवा:अति मीठ किंवा पाणी घेतल्यास सूज व श्वास लागणे वाढते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी 1.5–2 लिटरपर्यंत मर्यादित ठेवा.
५. लक्षणांवर लक्ष ठेवा:श्वास लागणे, छातीत दुखणे, पाय सुजणे, थकवा वाढणे ही लक्षणं वाढल्यास डॉक्टरांना त्वरित कळवा.
६. धूम्रपान व मद्यपान बंद करा:हृदयासाठी हे दोन्ही अत्यंत घातक असून रुग्णांनी त्यापासून पूर्णतः दूर राहावे.
७. सौम्य व्यायाम करा:डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणात चालणे, योग किंवा श्वसन व्यायाम करा. अति व्यायाम करू नये.
८. संतुलित आहार आणि झोप:फल, भाज्या, कमी मीठ असलेला आहार व नियमित पुरेशी झोप हृदयाच्या पुनर्प्राप्तीसाठी फायदेशीर असते.
कार्डिअॅक रिहॅब प्रोग्रामचे महत्त्व
LVEF ४५% पेक्षा कमी असलेल्या रुग्णांसाठी Cardiac Rehabilitation (Cardiac Rehab) हा एक अत्यावश्यक कार्यक्रम आहे. यामध्ये रुग्णांना व्यायाम, आहार व जीवनशैलीबाबत योग्य प्रशिक्षण दिलं जातं.Cardiac Rehabilitation (Cardiac Rehab) हा एक शास्त्रशुद्ध कार्यक्रम आहे ज्यात व्यायाम, आहार, मानसिक आधार, आणि जीवनशैलीतील सुधारणा यांचा समावेश असतो. यामुळे मृत्यूचा धोका २५-३०% ने कमी होतो आणि पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही घटते.

हा कार्यक्रम कसा मदत करतो?
योग्य व्यायाम, आहार व जीवनशैली शिकवतो.
लक्षणं तीव्र होण्याआधी ओळखण्याची क्षमता वाढवतो.
अचानक रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी करतो.
समाजिक जागरूकतेची गरज
हृदयविकार झाल्यानंतर औषधं घेणं ही केवळ एक बाजू आहे. रोजच्या सवयींमध्ये बदल, सतत निरीक्षण, आणि योग्य माहितीने सज्ज असणं ही दुसरी महत्त्वाची बाजू आहे. कार्डिअॅक रिहॅबचा लाभ घेण्यासाठी रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी संवाद साधावा.भारतासारख्या देशात, जिथे हृदयविकारामुळे दरवर्षी लाखो रुग्ण मृत्यूमुखी पडतात, तिथे यासारख्या पुनर्वसन कार्यक्रमांची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे.
हे पण वाचा health benifits of garlic : दररोज सकाळी 1 लसूण पाकळी खाल्ल्यास काय होते?
“फक्त 5 किलो वजन कमी! सुधारणारं आरोग्य दिसणारे बदल!
कार्डिअॅक रिहॅब – हृदय पुनर्प्राप्तीसाठी संजीवनी
Cardiac Rehabilitation (CR) हा हृदयविकार रुग्णांसाठी एक संपूर्ण उपाययोजना आहे. यामध्ये रुग्णांना विशेष व्यायाम, आहार, ताणतणाव नियंत्रण, जीवनशैली सुधारणा याबाबत मार्गदर्शन दिलं जातं. 2022 AHA/ACC च्या अहवालानुसार, कार्डिअॅक रिहॅब केल्यास मृत्यूदर २५–३०% ने घटतो आणि रुग्णालयात पुन्हा दाखल होण्याचा धोका कमी होतो.
कार्डिअॅक रिहॅबचे प्रमुख घटक:
शिक्षण:रोगाचे स्वरूप, औषधं, आहार आणि दिनचर्या याची माहिती ही पहिली पायरी असून डॉक्टरांचा सल्ला घेऊनच यावर योग्य अंमलबजावणी गरजेची
व्यायाम प्रशिक्षण: दुसऱ्या पायरी हृदयाच्या क्षमतेनुसार व्यायामाची योजना हलक्या व मध्यम स्वरूपामध्ये प्रशिक्षित तज्ञांच्या सल्ल्यानंतर अंमलबजावणी करायची आहे.
.मानसिक आधार:नैराश्य, चिंता यावर सल्ला व मदत.जोखीम घटक नियंत्रण:मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलवर नियंत्रण. या सर्व आपल्या हातातील गोष्टी असून यामध्ये आपल्या कुटुंबीय यांचा देखील महत्त्वाचा सहभाग असतोच.
LVEF < 45% असलेल्या रुग्णांसाठी “घरगुती काळजी + कार्डिअॅक रिहॅब” हा दुहेरी उपायच हृदयाच्या पुनर्प्राप्तीसाठी सर्वश्रेष्ठ ठरतो. योग्य वेळी उपचार, शिक्षण आणि जीवनशैलीत बदल केल्यास हृदयविकारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे.स्वतःसाठी आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी ही माहिती शेअर करा – कारण माहिती हीच आरोग्यरक्षणाची पहिली पायरी आहे.
टीप:- इथे दिलेली माहिती ही सर्वसाधारण वैद्यकीय तज्ञांच्या मतांवरती अवलंबून आहे व्यक्तीनुसार रोगाचे लक्षण त्याचं निदान हे वेगवेगळे असू शकतं त्यानुसार तज्ञच याबाबत उपचार पद्धती निश्चित करू शकतात त्यामुळे या माहितीच्या आधारे स्वतःला उपचारासाठी तयार करून योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वैद्यकीय आणि वैज्ञानिक संदर्भ (References):
1. American Heart Association (AHA)Cardiac Rehabilitation https://www.heart.org/en/health-topics/cardiac-rehab
2. 2022 AHA/ACC/HFSA Guideline for the Management of Heart FailureJournal of the American College of Cardiology https://www.jacc.org/doi/10.1016/j.jacc.2022.02.012
3. Mayo Clinic – Heart Failure and Low Ejection Fraction https://www.mayoclinic.org/diseases-conditions/heart-failure/symptoms-causes/syc-20373142
4. World Health Organization (WHO)Cardiovascular diseases (CVDs) factsheet https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/cardiovascular-diseases-(cvds)
5. PubMed Central (PMC) – Systematic Review on Effectiveness of Cardiac Rehabilitation https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC9050583/
6. AIIMS Delhi – Department of Cardiology Reports https://www.aiims.edu/en/departments-and-centers.html?id=193
7. Indian Heart Journal – Elsevier Publication (Journal of Cardiological Society of India) https://www.journals.elsevier.com/indian-heart-journal









