नवीन मोटार कायद्यात वाहनांचे गैरवापर तसेच वाहतुक नियमन सुलभ व्हावे म्हणुन हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP)ची अंमल बजावणी शासनाने केली आहे.त्यावर महाराष्ट्र शासनाने HSRP number plate अनिवार्य करण्याचा निर्ण घेतला. आता वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचे परिवहन विभागाने जाहीर केले आहे.वाहनधारकांनी आता वेळेत प्लेट बसवून घ्या अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
तुमच्या वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवण्यात येणार नाही. तुमच्याकडे आता काहीच दिवस शिल्लक आहेत. ही तुमच्या साठी शेवटची संधी असणार आहे. शासनाच्या परिवहन विभागाने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत नागरिकांना मुदत दिली आहे. पण यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, मुदतीच्या आत नंबर प्लेट बसवून घ्या, अन्यथा थेट दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
Table of Contents
15 ऑगस्टनंतर जर वाहनावर HSRP प्लेट नसेल, तर परिवहन वहन विभागाचे भरारी पथक थेट कारवाई करत तुम्हाला 1,000 ते 10,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते.

मुदतवाढीमागे न देण्यामागे नेमकी कारणे काय?
यापूर्वी एप्रिल अखेर त्यानंतर जून अखेर आणि आता 15 ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या पुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या प्रक्रियेला हवा तसा वेग मिळालेला नाही. कोट्यवधी वाहनांसाठी प्लेट्सची मर्यादित उपलब्धता, ऑनलाइन बुकिंगमधील तांत्रिक अडचणी, फिटमेंट सेंटरवरील प्रचंड गर्दी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या मर्यादा, यामुळे अनेकांना नंबर प्लेट बसवण्यात अडचणी आता पर्यंत येत होत्या. काही ठिकाणी प्लेट्स मिळण्यास उशीर होत होता, तर काहींना ऑनलाइन नोंदणी करतानाही त्रास सहन करावा लागला. या सर्व अडचणींमुळेच ही तिसरी आणि अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण सुमारे 2.1 कोटी वाहनांपैकी केवळ 23 लाख वाहनांवरच आतापर्यंत या प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत.
HSRP number plate कोणाला बंधनकारक?
कायद्यातील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवणे कायद्याने बंधनकारक आहे. यापूर्वी ३० एप्रिल २०२५ आणि नंतर ३० जून २०२५ अशा दोन वेळा परिवहन विभागाकडुन मुदतवाढ देण्यात आली होती. आता ती १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.ही मुदतवाढ अंतीम असणार आहे.
नोंदणी प्रक्रिया – महाराष्ट्रासाठी:
- अधिकृत पोर्टलवरील नोंदणी करावी – transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून थेट अर्ज करावा
- आपले RTO क्षेत्र निवडा, वाहन तपशील (RC, चेसिस/इंजिन नंबर इ.) भरा, फिटमेंट केंद्र आणि स्लॉट निवडा, ऑनलाइन पेमेंट करा, आणि नंतर फिटमेंटसाठी निर्धारित तारखेला सेवा घ्या
- नोंदणीची पुष्टी (booking receipt) किंवा भरणा पावती गरजेची आहे – ती जपुन ठेवा; किमान बुकिंग करून ठेवली तर तुम्हाला बसणार दंड टळू शकतो, अगदी प्लेट बसली नसली तरी सुध्दा!
HSRP अर्ज करण्यासाठी पायरी-पायरीने मार्गदर्शन (महाराष्ट्र)
Step-by-Step Guide to Apply for HSRP (Maharashtra)
पाऊल १: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
https://www.bookmyhsrp.com/ किंवा www.transport.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
सूचना: फसवणूक टाळण्यासाठी नेहमी फक्त अधिकृत वेबसाईटच वापरा. कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.
पाऊल २: वाहन प्रकार निवडा
- खालीलपैकी एक पर्याय निवडा:
- खाजगी वाहन (Private / Non-Transport)
- व्यावसायिक वाहन (Commercial / Transport)
पाऊल ३: वाहनाची माहिती भरा
तुमच्याकडून खालील माहिती विचारली जाईल:
- राज्य – महाराष्ट्र निवडा
- नोंदणी क्रमांक (Registration Number)
- चेसिस क्रमांकाचे शेवटचे ५ आकडे
- इंजिन क्रमांकाचे शेवटचे ५ आकडे
- वाहन प्रकार (उदा. दुचाकी, चारचाकी)
- इंधन प्रकार (Petrol, Diesel, CNG इ.)
- वाहन ब्रँड आणि मॉडेल (अधिकांश वाहनांसाठी आपोआप भरेल)
ही माहिती तुमच्या RC बुकशी जुळली पाहिजे.
पाऊल ४: फिटमेंट स्लॉट बुक करा
- जवळचे अधिकृत फिटमेंट सेंटर निवडा
- तुमच्या सोयीचा दिनांक आणि वेळ निवडा
शेवटच्या वेळेपर्यंत थांबू नका — स्लॉट लवकर भरतात.
पाऊल ५: ऑनलाइन पेमेंट करा
- ऑनलाइन पेमेंट करा (UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग)
- फी वाहन प्रकारानुसार असते (सुमारे ₹250 ते ₹600)
- यानंतर तुम्हाला बुकिंग पावती (receipt) मिळेल
पाऊल ६: पुष्टी मिळवा
- तुम्हाला मिळेल:
- बुकिंग पावती (PDF आणि ईमेलद्वारे)
- SMS पुष्टी संदेश
- ही पावती प्रिंट करून सुरक्षित ठेवा
पाऊल ७: फिटमेंट सेंटरला भेट द्या
- निवडलेल्या तारखेला आणि वेळेस फिटमेंट सेंटर वर जा
- सोबत घेऊन जा:
- बुकिंग पावती
- मूळ RC (नोंदणी प्रमाणपत्र)
- वैध ओळखपत्र (आवश्यक असल्यास)
तिथे तुमच्या वाहनावर HSRP प्लेट आणि रंगीत स्टीकर बसवण्यात येईल.
हे पण वाचा: e-aadhaar-app नवीन ई-आधार ॲप: आता आधार माहिती मोबाईलवरूनच बदलता येणार – जाणून घ्या कसे
HSRP number plate चे पेमेंट:
- दुचाकी: ₹531
- तीनचाकी: ₹500
- चारचाकी: ₹745 (GST सह)
- होम डिलिव्हरीसाठी: दुचाकी ₹125 आणि चारचाकी ₹250 अतिरिक्त
महत्त्वाचे मुद्दे:
| विषय | तपशील |
| 📅 अंतिम मुदत | १५ ऑगस्ट २०२५ — नंतर कोणतीही मुदतवाढ नाही |
| 🧾 बुकिंग पावती | जर तुम्ही वेळेत बुकिंग केली, तर नंतरचा स्लॉट असला तरी दंड टळू शकतो |
| ⛔ उशीर टाळा | शेवटच्या दिवशी सर्व्हर डाउन किंवा स्लॉट भरलेले असू शकतात |
| 🎨 रंगीत स्टिकर | इंधन प्रकार ओळखण्यासाठी अनिवार्य |
| 📞 मदत हवी असल्यास | https://www.bookmyhsrp.com येथील हेल्पलाइन वापरा |
आता मुदत वाढ नसल्याने त्वरीत नंबर प्लेट बसवा आणि दंड टाळा!









