IOCL Engineers recruitment 2025:इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) 2025 भरती च्या माध्यमातून इंजिनीअर्ससाठी आलेली आहे .इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने 2025 साठी अनेक भरती प्रक्रिया जाहीर केल्या आहेत, ज्यामुळे विविध क्षेत्रांतील पदवीधरांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीमध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअर, अप्रेंटिस (दक्षिण आणि पश्चिम विभाग) तसेच ज्युनिअर ऑपरेटर व इतर पदांचा समावेश आहे. या बातमीच्या लेखात, या पदांसाठीची पात्रता, पगार, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. ती आपण पाहूया
1. ग्रॅज्युएट इंजिनिअर भरती 2025
IOCL ने ग्रॅज्युएट इंजिनिअर्ससाठी मोठी भरती मोहीम हाती घेतली आहे. याची अधिकृत जाहिरात 26 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध झाली.
* पात्रता: उमेदवारांकडे बी.टेक किंवा बी.ई. (केमिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन) पदवी असणे आवश्यक आहे.
* अर्ज प्रक्रिया: सर्व अर्ज IOCL करिअर पोर्टलद्वारे ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.
* महत्त्वाच्या तारखा: अर्ज करण्याची प्रक्रिया 1 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 21 सप्टेंबर 2025 रोजी समाप्त होईल.
* पगार: पगार खूप आकर्षक आहे, तो ₹50,000 ते ₹1,60,000 पर्यंत असून यात अतिरिक्त भत्ते आणि सुविधांचा समावेश आहे.
* वयोमर्यादा: लवकरच अधिकृत अधिसूचनेत वयोमर्यादेचे निकष जाहीर केले जातील. यामध्ये केंद्र शासनाचे नियमाप्रमाणे व यामध्ये जात प्रवर्गणीय सवलत आहे.
* निवड प्रक्रिया: निवड प्रक्रिया कॉम्प्युटर-आधारित चाचणी (CBT), त्यानंतर ग्रुप डिस्कशन (GD) आणि वैयक्तिक मुलाखतीवर आधारित
CBT मध्ये काय विचारले जाईल?
तांत्रिक विषयांवरील प्रश्न,लॉजिकल रिझनिंग,क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड,इंग्रजी भाषा व संवाद कौशल्य
IOCL Engineers recruitment 2025 अर्ज कसा करावा:
* IOCL च्या अधिकृत करिअर वेबसाईटला भेट द्या.
* तुमच्या ईमेल किंवा मोबाईल नंबरने नोंदणी करा.
* तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
* आवश्यक कागदपत्रे, जसे की तुमचा फोटो, सही आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे अपलोड करा.
* अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
तुमच्या माहितीसाठी प्रिंट आउट काढायला विसरू नका.
2. अप्रेंटिस भरती 2025
ही भरती व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी देण्यासाठी आहे.
* दक्षिण विभाग (475 पदे): जाहिरात 6 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध झाली.
* पात्रता: * ट्रेड अप्रेंटिस: 10वी पास + ITI.
* टेक्निशियन अप्रेंटिस: मेकॅनिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा.
* ग्रॅज्युएट अप्रेंटिस: कोणत्याही शाखेतील पदवीधर.
* किमान गुण: सर्वसाधारण/EWS/OBC उमेदवारांसाठी किमान 50% गुण, तर SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 45% गुण आवश्यक आहेत.
* अर्ज कालावधी: अर्ज 8 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाले आणि 5 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू होते.
* वयोमर्यादा: 31 ऑगस्ट 2025 पर्यंत वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे.
* स्टायपेंड: स्टायपेंड अधिकृत अधिसूचनेनुसार असेल.
* पश्चिम विभाग (महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड): विविध ट्रेड, टेक्निशियन आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठीची अधिसूचना 16 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
maharashtra tait result 2025 महाराष्ट्र TAIT निकाल 2025 जाहीर असा पहा निकाल!
IOCL 2025 ची भरती ही इंजिनीअर्स, डिप्लोमा धारक आणि पदवीधर तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी म्हणजे केवळ स्थिर नोकरीच नव्हे तर उत्तम पगार, भत्ते व करिअर वाढीची हमी आहे.
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी IOCL ची अधिकृत वेबसाइट www.iocl.com भेट द्या.










Leave a Reply