Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या 12 ऑगस्टच्या बैठकीत 15631 पदांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार गृह विभागानं 15631 जागांवर पोलीस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस मान्यता देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने पोलीस आणि कारागृह विभागातील कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल. या निर्णयामुळे या महत्वाच्या विभागातील कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण होणार आहे. भरतीमध्ये एकूण १५,६३१ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या १२,३९९ जागा, पोलीस शिपाई चालक पदाच्या २३४ जागा, बँड्समनच्या २५ जागा, सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या २,३९३ जागा आणि तुरुंग शिपाई पदाच्या ५८० जागांचा समावेश आहे.
शासन निर्णयात काय म्हटलंय?
प्रस्तावना:-
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.०१.०१.२०२४ ते दि.३१.१२.२०२४ या कालावधीत रिक्त झालेली व दि.०१.०१.२०२५ ते दि.३१.१२.२०२५ या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवावयाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबतचा प्रस्ताव दि.१२.०८.२०२५ रोजी झालेल्या मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला त्यास मा. मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
शासन निर्णय :-
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.०१.०१.२०२४ ते दि.३१.१२.२०२४ या कालावधीत रिक्त झालेली व दि.०१.०१.२०२५ ते दि.३१.१२.२०२५ या कालावधीत रिक्त होणारी १५.६३१ पदे भरतीकरीता उपलब्ध होणार आहेत.

पदनाम : रिक्त पदांची संख्या
1. पोलीस शिपाई : 12399
2.पोलीस शिपाई चालक : 234
3. बॅण्डस्मन : 25
4 सशस्त्र पोलीस शिपाई : 2393
5 कारागृह शिपाई : 580
एकूण 15631
Maharashtra Police Bharti 2025 सर्वच जागा भरण्याची परवानगी
नियमानुसार प्रशासकीय विभागांना केवळ ५०% रिक्त जागा भरण्याची परवानगी आहे. परंतु, पोलीस आणि कारागृह विभागातील कर्मचाऱ्यांची निकड लक्षात घेता, शासनाने १००% जागा भरण्याची परवानगी दिली आहे. भरती प्रक्रियेत काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. घटक स्तरावर भरती प्रक्रिया विकेंद्रीकृत केली जाईल आणि OMR आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल. शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयातील तरतूदींमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Police Bharti 2025 मध्ये पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
सन 2022 व सन 2023मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात आलं आहे.
LIC AAO recruitment 2025 :LIC मध्ये नोकरी हवी आहे? 841 जागांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज
पोलीस भरती कधी आहे?
१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यानच्या रिक्त जागा आणि १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या अपेक्षित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शासन जीआची पीडीएफ येथे डाऊनलोड करा
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आहे आनंदाची पवर्णी
राज्यात लाखो तरुण आणि तरुणी पोलीस भरतीची तयारी करत असतात. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आहे आनंदाची पवर्णी असणार आहेराज्य सरकारनं 2024 आणि 2025 मधील रिक्त जागा मिळून 15631 जागांवर पोलीस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय जारी झाल्यानं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारनं आज जीआर प्रसिद्ध केला असून या मध्ये भरतीची प्रक्रिया, राबवण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस भरती संदर्भातील गृह विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानं आता पोलीस शिपाई भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भातील प्रक्रिया सुरु होईल.
maharashtra tait result 2025 महाराष्ट्र TAIT निकाल 2025 जाहीर असा पहा निकाल!
किती आहे अर्ज फी
खुला प्रवर्गासाठी अर्जाची फी ४५० रुपये आहे, तर राखीव प्रवर्गासाठी ३५० रुपये आहे. जमा झालेली फी भरती प्रक्रियेच्या खर्चासाठी वापरली जाईल. अतिरिक्त पोलीस महासंचालक, प्रशिक्षण आणि विशेष दल, महाराष्ट्र यांना अर्ज प्रक्रिया, छाननी आणि संबंधित कामांसाठी बाह्य सेवा पुरवठादार कंपनी निवडण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
पोलीस महासंचालकांचे भरती प्रक्रियेवर असणार विशेष लक्ष –
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र यांच्यावर संपूर्ण भरती प्रक्रियेची पारदर्शकता आणि देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही आक्षेप, विवाद, न्यायालयीन प्रकरणे किंवा विधायी बाबींसाठी पोलीस महासंचालक जबाबदार असतील. भरती प्रक्रियेसंबंधी शासन निर्णय महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पोलीस महासंचालकांनी पोलीस युनिट्सना परीक्षा प्रक्रियेसंबंधी तपशीलवार सूचना जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिक माहिती साठी महाराष्ट्र पोलीस दलाच्या संकेतस्थळास भट द्या









