MSCE Scholarship Exam 2026: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE Pune) तर्फे दरवर्षी घेण्यात येणारी पूर्व-उच्च प्राथमिक (PUP) आणि पूर्व-माध्यमिक (PSS) शिष्यवृत्ती परीक्षा ही राज्यातील प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे.
या परीक्षेद्वारे पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामगिरीच्या आधारे आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण अधिक सक्षम व प्रेरक बनते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती परीक्षा आणि निवासी शाळांमधील प्रवेशांसाठी अधिसूचना प्रसारित केली आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व-उच्च प्राथमिक आणि पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहेत. यासाठी २७ ऑक्टोबर २०२५ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ आहे. त्यानंतर १ डिसेंबर २०२५ ते १५ डिसेंबर २०२५ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल. १६ डिसेंबर २०२५ ते २३ डिसेंबर २०२५ पर्यंत विशेष विलंब शुल्क लागू असेल. २४ डिसेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अतिरिक्त विशेष विलंब शुल्क आकारले जाईल. ३१ डिसेंबर २०२५ नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.असा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे काढून या अधिसुचेनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
| टप्पा (Stage) | कालावधी (Period) |
| परीक्षा तारीख | ८ फेब्रुवारी २०२६ |
| ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू | २७ ऑक्टोबर २०२५ |
| ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची अंतिम मुदत | ३० नोव्हेंबर २०२५ |
| विलंब शुल्कासह अर्ज | १ डिसेंबर २०२५ ते १५ डिसेंबर २०२५ |
| विशेष विलंब शुल्कासह अर्ज | १६ डिसेंबर २०२५ ते २३ डिसेंबर २०२५ |
| अतिरिक्त विशेष विलंब शुल्कासह अर्ज | २४ डिसेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ |
| अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख | ३१ डिसेंबर २०२५ |
परीक्षा पद्धत (Exam Pattern and Structure)
पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठीची पूर्व-उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीची पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या दोन्ही वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतील. पाचवीच्या परीक्षेत सर्व प्रश्नांना चार पर्याय असतील आणि त्यापैकी एकच बरोबर उत्तर निवडायचे आहे. आठवीच्या परीक्षेत मात्र, ४०% प्रश्नांना चार पर्यायांपैकी दोन बरोबर उत्तरे असू शकतात, जी विद्यार्थ्यांना चिन्हांकित करावी लागतील. दोन्ही परीक्षांसाठी प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा अभ्यासक्रम असेल.
प्रत्येक परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे:
पाचवी (Pre Upper Primary – PUP)
- सर्व प्रश्नांना ४ पर्याय असतील.
- प्रत्येकी एकच योग्य उत्तर निवडायचे आहे.
आठवी (Pre Secondary – PSS)
- सुमारे ४०% प्रश्नांना दोन बरोबर उत्तरे असतील.
- विद्यार्थ्यांनी दोन्ही योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे.
विषय (Subjects Included)
दोन्ही परीक्षांसाठी खालील विषयांचा समावेश असेल:
- प्रथम भाषा
- गणित
- तृतीय भाषा
- बुद्धिमत्ता चाचणी (Intelligence Test)
पात्रतेचे निकष (Eligibility Criteria)
शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अर्ज करण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- रहिवासी: अर्जदार महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक पात्रता: विद्यार्थी मान्यताप्राप्त सरकारी, अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेत अनुक्रमे पाचवी किंवा आठवी इयत्तेत शिकत असावा.
- वयोमर्यादा (Age Limit – १ जून २०२५ रोजी विचारात घेतली जाईल):
- पाचवीसाठी: विद्यार्थी ११ वर्षांपेक्षा जास्त वयाचे नसावेत (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १५ वर्षे).
- आठवीसाठी: विद्यार्थी १४ वर्षांपेक्षा जास्त वयाचे नसावेत (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १८ वर्षे).
- उत्पन्नाची मर्यादा: मागासवर्गीय (एच आणि आय श्रेणी) विद्यार्थ्यांसाठी पूर्वी असलेली रु. २०,००० उत्पन्नाची मर्यादा आता काढून टाकण्यात आली आहे.
- टीप: जन्मतारखेत तफावत आढळल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते.
परीक्षेची माध्यमे (Languages of Examination)
परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाईल:
- माध्यमे: मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड.
- सेमी-इंग्रजी पर्याय: मराठी + इंग्रजी, उर्दू + इंग्रजी, हिंदी + इंग्रजी, गुजराती + इंग्रजी, तेलुगू + इंग्रजी आणि कन्नड + इंग्रजी.
- सेमी-इंग्रजी पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित (पेपर १) आणि बुद्धिमत्ता चाचणी (पेपर २) च्या प्रश्नपत्रिका मूळ माध्यम आणि इंग्रजीमध्ये दिल्या जातील.
परीक्षा शुल्क (Examination Fees)
- सामान्य प्रवर्ग: रु. २००
- राखीव प्रवर्ग (SC, ST, VJ-A, NT-B, NT-C, NT-D): रु. १२५
- शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. शाळांनी सर्व शुल्क ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत परिषदेच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे, अन्यथा प्रवेशपत्र रोखले जाऊ शकते.
How to apply for MSCE Scholarship Exam 2026: अर्ज कसा करायचा?
सर्व अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने सादर करावे लागतील
- अधिकृत वेबसाइट्स: अर्ज www.mscepune.in आणि www.msce.in या अधिकृत वेबसाइट्सवर सादर करावे लागतील.
- अनिवार्य तपशील: विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक अर्जासाठी अनिवार्य आहे. शिष्यवृत्ती वितरणासाठी नंतर बँक खाते तपशील आवश्यक असतील.
- शाळेची जबाबदारी: शाळांनी अर्जातील माहितीची अचूकता सुनिश्चित करावी आणि अर्जाचे प्रिंटआउट, शुल्क पावती व इतर आवश्यक कागदपत्रे पडताळणीसाठी जतन करावीत.
शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ अधिसूचना
शिष्यवृत्ती रकमेत वाढ –
शिष्यवृत्तीच्या रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मासिक ५०० रुपये (वार्षिक ५००० रुपये) आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मासिक ७५० रुपये (वार्षिक ७५०० रुपये) वाढ झाली आहे. मागासवर्गीय (एच आणि आय श्रेणी) विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा पूर्वी २०,००० रुपये होती, ती आता काढून टाकण्यात आली आहे.
निवासी शाळा प्रवेश निकष (Residential School Admission Criteria)
शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच काही विद्यार्थ्यांना या परीक्षेद्वारे शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळू शकतो.
या प्रवेशांसाठी विशिष्ट निकष ठरवले गेले आहेत:
- शासकीय निकेतन:
- पाचवीत शिकणारे, ग्रामीण शाळेतील आणि मुलगा असणे आवश्यक आहे. मुलींना प्रवेश दिला जाणार नाही.
- आदिवासी निकेतन:
- अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील आणि शासकीय आदिवासी क्षेत्रात राहणारे विद्यार्थी पात्र असतील. मुलींना प्रवेश दिला जाणार नाही.
- विमुक्त जाती व भटक्या जमाती निकेतन:
- आश्रमशाळेत शिकणारे आणि मराठी किंवा सेमी-इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी पात्र ठरतील.
महत्त्वाची सूचना:
३१ डिसेंबर २०२५ नंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत सादर करणे अत्यावश्यक आहे.










Leave a Reply