भारत सरकारने नागरिकांच्या पैसे देवाण-घेवाण करिता आणि जवळपास सर्वच व्यवहारांसाठी UPI (Unified Payments Interface) लागू केली तेंव्हा पासुन सर्व सामान्यांच्या आर्थिक स्तरामध्ये खुप फरक पडला आहे. नुकताच जगातील प्रतिष्ठित प्रणालींना टक्कर देत युपीआय ने व्यवहारांच्या संख्येचा एक जागतिक विक्रम केला आहे. जस जसे व्यवहार वाढत आहेत तसे बँकींग प्रणालीस हे व्यवहार नियमन करणे कठिण जात आहे.त्यासाठी १ ऑगस्ट २०२५ पासून UPI (Unified Payments Interface) वापरकर्त्यांसाठी काही महत्त्वाचे बदल लागू करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI प्रणाली अधिक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी हे नियम आणले आहेत. Paytm, PhonePe, GPay आणि BHIM सारखे UPI ॲप्स वापरणाऱ्या सर्वांना याचा परिणाम जाणवेल.याबाबत आपण सविस्तर पणे माहिती करुन घेऊया.
हे पण वाचा;-
GST PAYMENTS: लहान व्यवसाय, नोंदणी नसलेले व्यापारी UPI आणि रोख व्यवहारामुळे GST विभागाच्या रडारवर 1
१ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणारे प्रमुख UPI नियम:
- बॅलन्स तपासण्याची मर्यादा (Balance Check Limit):
- आता तुम्ही तुमच्या UPI ॲपवर दिवसातून फक्त ५० वेळा तुमच्या बँक खात्यातील शिल्लक (बॅलन्स) तपासू शकाल.
- तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असलेल्या बँक खात्यांची स्थिती (स्टेटस) दिवसातून केवळ २५ वेळा तपासता येईल. वारंवार बॅलन्स तपासल्याने किंवा स्टेटस रिफ्रेश केल्याने सर्व्हरवर अनावश्यक ताण येतो, हे कमी करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
- व्यवहार स्थिती तपासण्याची मर्यादा (Transaction Status Check Limit):
- तुम्ही तुमच्या व्यवहाराची स्थिती (ट्रान्झॅक्शन स्टेटस) दिवसातून फक्त ३ वेळा तपासू शकाल.
- प्रत्येक तपासणीमध्ये किमान ९० सेकंदांचे अंतर असणे आवश्यक आहे.
- (Autopay)ऑटोपे व्यवहारांमध्ये बदल (Changes in AutoPay Transactions):
- Netflix चे सबस्क्रिप्शन, EMI किंवा बिलांचे ऑटोपेमेंट्स आता विशिष्ट वेळेच्या स्लॉटमध्येच प्रोसेस होतील. हे पेमेंट दिवसाच्या कोणत्याही वेळी होण्याऐवजी, आता सकाळी १० वाजेच्या आधी, दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आणि रात्री ९:३० नंतर अशा ठराविक वेळेत प्रोसेस केले जातील. यामुळे पेमेंट ट्रॅफिक कमी होईल आणि ऑटोमॅटिक पेमेंट्स अधिक सुरळीत होतील.
ऑटो–डेबिट व्यवहारासाठी निश्चित वेळा
-सकाळी १० वाजेपूर्वी
-दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत
-रात्री ९:३० नंतर
तुमच्यासाठी होणारे बदल
| क्रिया | नवीन नियम | परिणाम |
| बॅलन्स तपासणी | दिवसातून जास्तीत जास्त ५० वेळा | वारंवार तपासल्यास मर्यादा गाठू शकता |
| लिंक केलेली खाती पाहणे | दिवसातून जास्तीत जास्त २५ वेळा | अनेक खाती वापरणाऱ्यांना अडचण येऊ शकते |
| पेमेंट स्टेटस तपासणी | एका व्यवहारासाठी फक्त ३ वेळा, प्रत्येक वेळेस ९० सेकंदांचे अंतर | पेमेंट पेंडिंग असल्यास थोडा संयम ठेवा |
| ऑटो–पे व्यवहार | ठराविक वेळेतच प्रक्रिया होईल: सकाळी १० पूर्वी, दुपारी १–५, रात्री ९:३० नंतर | Netflix, SIP यांसारख्या सबस्क्रिप्शनसाठी वेळेची काळजी घ्या |
| अक्रियाशील मोबाईल नंबर | ९० दिवस वापर न झाल्यास UPI बंद होऊ शकतो | UPI नंबर दर ३ महिन्यांत एकदा तरी वापरा |
- निष्क्रिय खात्यांवर परिणाम (Impact on Inactive Accounts):
- असे UPI खाते जे निष्क्रिय आहेत किंवा ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहेत ते इनॲक्टिव्ह झाले आहेत, ती खाती १ एप्रिल २०२५ पासून बंद केली जातील. NPCI ने सर्व बँकांना अशा खात्यांवर UPI ॲक्टिव्हेशन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या मुळे विनाकारण निष्क्रिय खात्यांचे युपीआय संभाळण्याचे काम कमी होणार आहे.
रक्कम पाठवण्यावर मर्यादा ?
UPI साठीची कमाल व्यवहार मर्यादा (सामान्यतः ₹१ लाख, किंवा आरोग्य व शिक्षण यांसारख्या विशिष्ट श्रेणींसाठी ₹५ लाख) या नवीन नियमांमुळे बदललेली नाही. त्यामुळे अशा व्यवहरात कोणताही बदल होणार नाही.
नेहमीचे व्यवहार जसे की रिचार्ज, दुकानातील खरेदी, मित्रांना पैसे पाठवणे — हे पूर्वीप्रमाणेच चालू राहतील.
काय आहेत वापरकर्त्यांसाठी सूचना
- वारंवार बॅलन्स तपासणे टाळा
- व्यवहार फेल झाल्यास लगेच स्टेटस तपासण्याऐवजी थोडा वेळ थांबा
- ऑटो पेमेंट वेळा लक्षात ठेवा
या नियमांचा उद्देश काय आहे?
या बदलांमागे मुख्य उद्देश UPI प्रणालीवरील ताण कमी करणे, व्यवहारांची गती वाढवणे, सुरक्षितता वाढवणे आणि सर्व्हरवर होणारा अनावश्यक लोड कमी करणे हा आहे. यामुळे UPI वापरकर्त्यांना अधिक चांगला आणि विश्वासार्ह अनुभव मिळेल.
हे नियम Paytm, PhonePe, GPay, BHIM सह इतर सर्व UPI ॲप्स वापरणाऱ्या सर्व नागरिकांना लागू होतील. त्यामुळे तुम्ही जर वारंवार UPI बॅलन्स तपासत असाल किंवा ट्रान्झॅक्शन स्टेटस चेक करत असाल, तर या नवीन नियमांची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्रश्न: या नवीन UPI नियमांसाठी वापरकर्त्यांनी काही कृती करावी लागेल का?
उत्तर: नाही, तुमच्याकडून कोणतीही तात्काळ कृती आवश्यक नाही. हे बदल तुमच्या UPI अॅप्सद्वारे आपोआप लागू केले जातील. फक्त नवीन मर्यादांची माहिती ठेवा, जेणेकरून दिवसात अनावश्यक व्यवहार अडथळ्यांना सामोरे जावे लागणार नाही.
प्रश्न: हे बदल व्यापारी पेमेंट्स आणि बिलर्सवर परिणाम करतील का?
उत्तर: होय, पण फक्त ऑटो-पे व्यवहारांच्या वेळापत्रकापुरते. जे व्यवसाय UPI द्वारे स्वयंचलित पेमेंट्स गोळा करतात, त्यांना नवीन वेळापत्रकानुसार आपली प्रणाली जुळवावी लागेल. मात्र, सामान्य वापरकर्त्यांसाठी — जसे की मोबाईल रिचार्ज किंवा सबस्क्रिप्शनसाठी पेमेंट — व्यवहार नेहमीप्रमाणेच चालू राहतील.









