
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने स्वतःला बदलण्यासाठी खूप मोठे निर्णय घेतले हर्षवर्धन सपकाळ यांच्या खांद्यावरती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली. त्यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी रणनीती आखणं चालू केला आहे. तरी देखील काँग्रेस पक्षाचे मोठे मोठे नेते पक्ष सोडणे थांबवत नाहीत. पाथरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेस पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष श्री सुरेश वरपूडकर हे 29 जुलैला माझी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसला जोरदार राजकीय धक्का दिला जात असून परभणी जिल्ह्यातून काँग्रेसला मिळालेल्या धक्के तंत्रात यात पूर्वीच्या काँग्रेसवासी व विद्यमान मंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर साकोरे महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 18 जुलै 2025 रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर यांनी हा निर्णय घेतला आहे असं बोललं जात आहे .असं मानलं जातं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाडयाच्या राजकारणात घडत असलेली ही मोठी घडामोड मानली जातेय. विधानसभा निवडणुकीत मविआला जोरदार धक्का बसल्यानंतर महायुतीमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढले. सर्वाधिक फटका ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसला बसला आहे. मराठवाड्यात भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले असून आपली ताकद वाढवली आहे.2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश करणारे राजेश विटेकर यांचे कडून पराभव झाल्यानंतर श्री वरपूडकर अस्वस्थ होते त्यानंतर त्यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातील अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याच बोललं जातं.
पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांच्या व्यतिरिक्त विद्यमान आमदार राजेश विटेकर माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी( सध्या स्वतःच्या नावाने मित्र मंडळ चालवतात), व मतदार संघामध्ये स्वतःच अस्तित्व तयार केलेले शिवसेना शिंदे गटाचे सईद खान शेर गुल खान हे एकूण तुल्यबळ नेते असून त्यात स्वतःच अस्तित्व आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने सुरेश वरपूडकर यांनी हे पाऊल उचलले असल्याचं त्यांचे कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलतात.

माजी आमदार आमदार सुरेश वरपूडकर यांचे विषयी थोडक्यात:-
○ जिल्हाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा प्रतोद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
○भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष करून परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर मतदार संघातून सन 1986 ते 2004 दरम्यान आमदार
– सन 1998 मध्ये परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार
-सन 2019 मध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार.
पूर्वीच्या सिंगणापूर मतदारसंघाचा बराचसा भाग पूर्णरचनेनंतर पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील आहे त्यामुळे सदर मतदारसंघांमध्ये यांची राजकीय पकड असून जवळजवळ प्रत्येक गावात यांचे कार्यकर्ते आहेत.
राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत असलेले सुरेश वरपूडकर यांनी नंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर परभणी जिल्ह्यात भाजपची साथ धरणार असल्याने एकूणच मराठवाड्यामध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता भाजपची ताकद वाढणार असून महाविकास आघाडीचे दोन तुल्यबळ नेते माजी आमदार विजय भांबळे व विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्याशी दोन हात करण्याची तयारी भाजपने या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून पूर्ण केली आहे. त्याबरोबरच महायुतीतील मित्रपक्ष मध्ये परभणी जिल्ह्यात आपणच वरचढ राहू याची तजवीज देखील भाजपने करून ठेवली आहे.
या निर्णयानंतर पाथरी विधानसभा मतदारसंघात काय बदलल? माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे सुरेश वरपूडकर यांच्या निर्णयानंतर त्यांच्यापासून दूर झालेला मुस्लिम मतदार आपल्याकडे ओढण्याच्या प्रयत्न दिसून येत आहेत त्याला शिवसेना नेते सईद खान हे खो घालत असल्याचे चित्र आहे. – एम आय एम पक्षांने त्यांच्या या निर्णयानंतर आपला जनाधार वाढवण्यासाठी परत एकदा संपर्क कार्यालय मोठ्या जोमात सुरू केला असून काही माजी नगरसेवक व तालुक्यातील इतर महत्त्वाचे नेते स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.- आमदार राजेश विटेकर यांनी सुरेश वरपूडकर यांच्या या निर्णयाबद्दल बोलण्याचा टाळले असून ते थेट कोणाशी वाद करून न घेण्याच्या प्रवृत्तीचे आहेत त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांशी ते याबद्दल येणाऱ्या काळात चर्चा करतील असं त्यांच्या निकटवर्ती यांनी बोलले आहे.
या सर्व प्रवेशाचा परभणी महानगरपालिके वरती देखील परिणाम होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर परभणी महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर शिवसेना पक्षाची खासदार संजय जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबाजानी दुर्रानी व स्वतः वरपूडकर यांनी एकादृश्य युती केली होती. त्या युतीचा वापर व राजकीय समीकरणे लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीतही केले होते मात्र विधानसभेच्या वेळी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी वेगळी भूमिका घेतली होती. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ते अशाच पद्धतीने राहतील किंवा यामध्ये बदल होईल हे चित्र आता निवडणुकीच्या दरम्यानच स्पष्ट होईल.








