RBI Grade B Recruitment 2025:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 120 ग्रेड बी अधिकारी पदांसाठी 2025 ची भरती अधिसूचना जाहीर केली आहे. हे पद भारतातील सर्वात प्रतिष्ठित बँकिंग नोकऱ्यांपैकी एक आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे याची अर्ज प्रक्रिया 10 सप्टेंबर 2025 पासुन सुरु झाली आहे . ज्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांना ही एक सुवर्णसंधी आहे. उमेदवार केवळ ऑनलाइन पद्धतीने rbi.org.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
Table of Contents
RBI Grade B Recruitment 2025 : मुख्य तपशील आणि महत्त्वाच्या तारखा
नोकरीचा प्रकार:
- भरती संस्था: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड
- पदांची संख्या: 120
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
- पगार: अंदाजे ₹1.5 लाख प्रति महिना (मूळ वेतन ₹78,450 + इतर भत्ते)
- अर्ज पद्धत: फक्त ऑनलाइन
महत्त्वाच्या तारखा: RBI Grade B Recruitment 2025 important dates
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 सप्टेंबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2025 (संध्याकाळी 6:00 पर्यंत)
- परीक्षा:
- फेज-I (जनरल): 18 ऑक्टोबर 2025
- फेज-II (जनरल): 6 डिसेंबर 2025
- फेज-I (DEPR & DSIM): 19 ऑक्टोबर 2025
- फेज-II (DEPR & DSIM): 7 डिसेंबर 2025
- मुलाखत: जानेवारी-फेब्रुवारी 2026 (अंदाजे)
पदांनुसार तपशील आणि पात्रता
पदांची माहिती:
- जनरल कॅडर: 83 पदे
- डीईपीआर (DEPR): 17 पदे
- डीएसआयएम (DSIM): 20 पदे
हे पण वाचा Gate Exam notification 2026: नोंदणी सुरू, अर्ज प्रक्रिया आणि महत्वाची माहिती
RBI Grade B Recruitment 2025 (Eligibility Criteria) पात्रता निकष:
- वयोमर्यादा: 1 सप्टेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षे (ओबीसीसाठी 3 वर्षे, एससी/एसटीसाठी 5 वर्षे सूट)
- शैक्षणिक पात्रता:
- जनरल कॅडर: कोणत्याही शाखेतील पदवी (खुला वर्ग: 60%, एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: 50%) किंवा पदव्युत्तर पदवी (55%).
- डीईपीआर: अर्थशास्त्र/वित्त विषयात पदव्युत्तर पदवी (खुला वर्ग: 55%, एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: 50%).
- डीएसआयएम: सांख्यिकी/डेटा सायन्स/गणित/इत्यादीमध्ये पदव्युत्तर पदवी (55%) किंवा 4 वर्षांची पदवी (60%).
निवड प्रक्रिया आणि अर्ज शुल्क
निवड प्रक्रिया:
- फेज-I (पूर्व परीक्षा): वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षा, ज्यात क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान यावर प्रश्न असतात.
- फेज-II (मुख्य परीक्षा): वर्णनात्मक आणि वस्तुनिष्ठ परीक्षा, ज्यात अर्थशास्त्र, वित्त, आणि इंग्रजी लेखन कौशल्याचे मूल्यांकन केले जाते.
- मुलाखत: अंतिम टप्पा, ज्यात उमेदवाराची वैयक्तिक मुलाखत घेतली जाते.
अर्ज शुल्क
- खुला/ओबीसी/ईडब्ल्यूएस: ₹850 + जीएसटी
- एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: ₹100 + जीएसटी
- आरबीआय कर्मचारी: शुल्क माफ
हे पण वाचा RBI bank loan: रिझर्व बँक कर्जासंबंधी निर्णय घेण्याच्या तयारीत, सामान्य कर्जदारावर काय होणार परिणाम?
RBI Grade B Recruitment 2025:अर्ज करण्याची प्रक्रिया (Step-by-Step Guide):
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
➤ https://www.rbi.org.in
- Opportunities@RBI वर क्लिक करा
मुख्य पानावर उजव्या कोपऱ्यात “Opportunities@RBI” हे टॅब दिसेल → त्यावर क्लिक करा - Current Vacancies → Vacancies → RBI Grade B 2025 Notification
येथे संपूर्ण जाहिरात वाचता येईल आणि अर्ज करण्याचा दुवा मिळेल. - “Apply Online” वर क्लिक करा
→ नवीन विंडो उघडेल जिथे तुम्हाला प्रथम नोंदणी (Registration) करावी लागेल. - नोंदणी फॉर्म भरा:
- संपूर्ण नाव
- मोबाईल नंबर
- ई-मेल ID
- पासवर्ड तयार करा
- कॅप्चा टाका व सबमिट करा
- दस्तऐवज अपलोड करा:
- पासपोर्ट साईझ फोटो
- स्वाक्षरी
- डाव्या अंगठ्याचा ठसा (if asked)
- हस्ताक्षराचा नमुना (ज्येष्ठ सत्रांसाठी)
- अर्ज फी भरा:
- UPI / कार्ड / नेट बँकिंगच्या माध्यमातून
- यशस्वी पेमेंटनंतर पावती मिळेल
- अंतिम सबमिट करा आणि प्रिंट घ्या:
- एकदा सगळं तपासून “Final Submit” करा
- अर्जाची PDF प्रत व फी भरल्याचा पुरावा सेव्ह करून ठेवा
RBI Grade B पूर्व परीक्षा (Phase-I) साठी तयारी टिप्स
परीक्षा स्वरूप:
- पूर्णतः ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा
- एकूण 200 गुण | 120 मिनिटं
- निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ¼ गुण वजा
विषय व गुणवाटप:
| विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
| सामान्य जागरूकता (General Awareness) | 80 | 80 |
| इंग्रजी भाषा (English Language) | 30 | 30 |
| संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude) | 30 | 30 |
| बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning Ability) | 60 | 60 |
तयारीसाठी अभ्यासक्रम,मार्गदर्शक टिप्स:
1. सामान्य जागरूकता (GA)
- RBI, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, सरकार धोरणं, योजनेवर लक्ष द्या
- स्रोत:
- PIB, RBI Notifications
- बँकिंग व चालू घडामोडी मासिक
- Spotlight / Vision IAS सारखे मासिक सारांश
- Last 6 महिन्यांच्या चालू घडामोडी अत्यावश्यक
2. इंग्रजी भाषा
- व्याकरण, शब्दसंग्रह, Cloze Test, Para Jumbles, RC वर लक्ष केंद्रित करा
- दैनंदिन इंग्रजी वाचन (द हिंदू / Indian Express) उपयुक्त ठरेल
3. संख्यात्मक अभियोग्यता
- Data Interpretation, Simplification, Quadratic Equations, Arithmetic (Profit & Loss, SI/CI, Time & Work)
- R.S. Agarwal, Sarvesh Verma यांसारखी पुस्तके उपयुक्त
4. बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)
- Seating Arrangement, Puzzle, Syllogism, Blood Relation, Input-Output, Coding-Decoding
- Mock Tests खूप महत्त्वाचे
(Resources):
- Test Series: Adda247, Oliveboard, PracticeMock
- Books:
- Quant: Arun Sharma / Sarvesh Verma
- Reasoning: R.S. Agarwal / BSC Publication
- GA: Monthly magazines, RBI Annual Reports
- English: Wren & Martin + Editorial Reading
One response to “RBI Grade B Recruitment 2025 : 120 पदांसाठी सुवर्णसंधी, अर्ज, पात्रता, पगार, परीक्षा पॅटर्न आणि संपूर्ण माहिती”

Yes
The application for RBI Grade B Recruitment 2025 can be submitted on the official website. Details of the available positions include eligibility criteria, selection process, and application fee. For further information, please refer to the Gate Exam notification 2026 for registration details and important updates.










Leave a Reply