Samsung updates: आपण फोन मध्ये अपडेट नाही आले , तू तेवढीशी चांगली सेवा देत नसेल तर लगेच फोन बदलतो. काहीजण वर्षाला फोन बदलतात तर काही दोन-तीन वर्षाला फोन बदलतात. तुमचा फोन चांगला असेल आणि तुम्हाला तो जास्त काळ वापरायचं असेल तर त्यात अपडेट आले तर बदलत्या तंत्रज्ञानासह आपल्याला तो फोन वापरता येतो.अशांसाठी एक खुशखबर आहे सॅमसंग ने One UI 8 अपडेट प्रसारित करण्याची तयारी चालवली आहे. जो Android 16 वर आधारित आहे. कंपनीने या अगोदर मे महिन्यामध्ये बीटा वर्जन प्रसारित केलं होतं आणि आता कंपनीने स्टेबल वर्जन प्रसिद्ध करण्याची तयारी चालवली आहे. हे अपडेट Galaxy S Z Fold और A सीरीजच्या स्मार्टफोन सोबत टैबलेट यूजर्स यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे.
Table of Contents
सध्याच्या काळामध्ये सॅमसंग मोबाईल कंपनी ही One UI 8 अपडेट हे प्रसारित करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी कंपनी ने Android 16 वर आधारित असलेलं One UI 8 Beta प्रसारित केलं होतं त्यामुळे त्यांचा युजर इंटरफेस हा बऱ्यापैकी बदलला होता आणि बदलत्या तंत्रज्ञानासह मोबाईल अधिक वेगवान व वापरास सुलभ केला होता . आता नव्याने कंपनीने गॅलेक्सी सिरीज मधील मोबाईल हँडसेट साठी अँड्रॉइड 16 वर आधारित कस्टम युजर इंटरफेस च स्टेबल वर्जन वापरत असलेल्या मोबाईल साठी आणण्याच्या तयारीत आहे.
सॅमसंगच्या फ्लॅगशिप Galaxy S, फोल्डेबल Z आणि मिड-रेंज A सिरीज स्मार्टफोनसोबतच बजेट फोन आणि गॅलेक्सी टॅबलेट वापरणारे यूजर्स ते वापरत असलेल्या हँडसेट मध्ये One UI 8 च्या अपडेट साठी प्रतीक्षेत आहेत. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कंपनीच्या आगामी One UI 8 च्या देत असलेल्या अपडेट संबंधित संभाव्य रोलिंग टाइमलाइनबद्दल आणि कोणत्या-कोणत्या डिव्हाइसेसना हा अपडेट मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.
सॅमसंगच्या कोणत्या हँडसेट व डिवाइसला मिळणार One UI 8 अपडेट?

सॅमसंगने अद्यापपर्यंत Android 16 आणि One UI 8 अपडेट मिळणाऱ्या स्मार्टफोन आणि टॅबलेट मॉडेल्सची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. मात्र, कंपनीच्या डिव्हाइस अपडेट पॉलिसीच्या आधारे आम्ही अशा डिव्हाइसची यादी तयार केली आहे, ज्यांना हा अपडेट रोलआउट केला जाऊ शकतो. यामध्ये बदल होऊ शकतो. तरीही संभवता यादी असून यांना अपडेट मिळू शकते.
Galaxy S सीरीज
Galaxy S25, S25+, S25 Ultra, S25 Edge
Galaxy S24, S24+, S24 Ultra, S24 FE
Galaxy S23, S23+, S23 Ultra, S23 FE
Galaxy S22, S22+, S22 Ultra
Galaxy S21 FE
Galaxy Z सीरीज
Galaxy Z Fold SE
Galaxy Z Fold 6, Flip 6
Galaxy Z Fold 5, Flip 5
Galaxy Z Fold 4, Flip 4
Galaxy Tab
Galaxy Tab S10 Lite, Tab S10+, S10 Ultra, S10 FE, S10 FE+
Galaxy Tab S9, S9+, S9 Ultra, S9 FE, S9 FE+
Galaxy Tab S8, S8+, S8 Ultra
Galaxy Tab S6 Lite (2024)
Galaxy Tab A9, A9+
Galaxy Tab Active 5, Active 5 Pro
Galaxy A सीरीज चे स्मार्टफोन
Galaxy A73
Galaxy A56, A55, A54, A53
Galaxy A36, A35, A34, A33
Galaxy A26, A25, A24, A23
Galaxy A17, A16 (LTE/5G), A15 (LTE/5G), A14 (LTE/5G)
Galaxy A07 (LTE), A06 (LTE/5G)
Galaxy M सीरीज चे स्मार्टफोन
Galaxy M56, M55, M55s, M54, M53
Galaxy M36, M35, M34, M33
Galaxy M16, M15
Galaxy M06, M05
Galaxy F सीरीज चे स्मार्टफोन
Galaxy F56, F55, F54
Galaxy F36, F34
Galaxy F16, F15, F14 (LTE)
Galaxy F06, F05
जर तुमचा Samsung Galaxy हँडसेट या यादीमध्ये समाविष्ट असेल तर तुमच्यासाठी कंपनी अपडेट प्रसारित करेल.
One UI 8 चे खास वेशिष्टये
*AI-Enhanced Interface: वापराच्या सवयींवर आधारित स्मार्ट सजेशन्स देतो, ज्यामुळे डिव्हाईस अधिक वैयक्तिक अनुभव देते
*Multitasking Improvements: मल्टिटास्किंगमध्ये सुधारणाही झाल्या असून, Split-screen आणि floating windows यांचा वापर आता अधिक सुलभ झाला आहे
*Security Boost: Knox Vault आणि KEEP द्वारे तुमचा डेटा अधिक सुरक्षित ठेवण्यास मदत होईल
*Visual Upgrades: Dynamic wallpapers, immersive animations मुळे तुमचा इंटरफेस अधिक आकर्षक होईल.
*Samsung DeX Refinement: या बदलामुळे मोबाईलवर डेस्कटॉपसारखा अनुभव देईल.
must read Samsung Galaxy F36 5G: डिझाइन आणि AI चा संगम
One UI 8 चे मुख्य फायदे
1. AI-Enhanced Interface
- वापराच्या सवयींवर आधारित Now Bar आणि Now Brief सारखी AI सजेशन्स.
- फोटो AI: सामान्य फोटोला प्रोफेशनल पोर्ट्रेटमध्ये रूपांतर करण्याची क्षमता.
2. Multitasking Improvements
- 90:10 Split-Screen Mode: मुख्य अॅपला अधिक स्क्रीन स्पेस देऊन दुसऱ्या अॅपचा सहज वापर.
- Floating windows आणि flexible split-screen अनुभव अधिक सुलभ.
3. Security & Privacy
- Knox Vault आणि KEEP द्वारे ऑन-डिव्हाइस AI प्रोसेसिंगसह डेटा सुरक्षितता.
- Secure Folder मध्ये अॅप्स लपवण्याची सुविधा, नवीन फिंगरप्रिंट रजिस्ट्रेशन आवश्यक.
4.Visual & UX Upgrades
- Dynamic wallpapers आणि immersive animations.
- Refined widgets आणि UI elements अधिक आकर्षक आणि सुसंगत2.
5. Quick Share & Connectivity
- Redesigned Quick Share: आता Quick Settings मधून थेट अॅक्सेस.
- Auracast Audio Sharing: ग्रुपमध्ये एकत्रित ऑडिओ अनुभव.
6. Samsung DeX Experience
- Android 16 च्या Desktop Mode वर आधारित नवीन DeX इंटरफेस मोबाईल ला भेटेल.
- Display resolution आणि screen rotation साठी तुम्हाला अधिक पर्याय उपलब्ध होईल.
Samsung One UI 8:Samsung updates मिळण्याची क्रमवारी
Samsung ने अधिकृतरीत्या या अपडेटच्या क्रमवारी बद्दल अधिकृतरित्या सांगितले आहे की कंपनी सप्टेंबर 2025 पासून One UI 8 च्या स्टेबल व्हर्जनच अपडेट हँडसेट धारकांना देण्याचा क्रम सुरू करेल. सर्वप्रथम हा अपडेट Galaxy S25 सिरीज साठी उपलब्ध होईल. त्यानंतर Galaxy S24, Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 सारख्या स्मार्टफोनसाठी हा अपडेट जारी केला जाईल.
सुमारे एका आठवड्याच्या अवधी नंतर कंपनी उर्वरित Galaxy S-सिरीज आणि Galaxy Tablets साठी One UI 8 चा स्टेबल अपडेट प्रसारित करेल.मिळालेल्या माहिती नुसार, काही Galaxy A-सिरीज मॉडेल्सना प्रीमियम मॉडेल्सच्या आधीच हा अपडेट दिला जाईल, कारण त्यांना बीटा प्रोग्राममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. बीटा प्रोग्रॅमची अपडेट या मोबाईल धारकांना अगोदरच मिळालेले आहेत.
कंपनीच्या म्हणण्यानुसार मोबाईलच्या प्रोसेसर तसेच कॅमेरा प्रोग्रामिंग मध्ये अधिक स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला आहे ज्याचा वापर हा ए आय आधारित कंटेंट तयार करण्यामध्ये व त्यामध्ये अचूकता आणण्यासाठी मदत करेल.
Related video:










Leave a Reply