• About us
  • contact us
  • disclaimer
  • Privacy Policy
  • homepage
Sunday, March 8, 2026
No Result
View All Result
vidhanwarta
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार
vidhanwarta
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार
No Result
View All Result
vidhanwarta
No Result
View All Result

सुकन्या समृद्धी योजना की फिक्स्ड डिपॉझिट: आपल्या मुलीच्या भविष्याकरिता योग्य पर्याय कोणता?

vidhanwarta by vidhanwarta
24 August 2025
in अर्थविश्व
0
सुकन्या समृद्धी योजना व फिक्स्ड डिपॉझिट तुलना – मुलीच्या भविष्याकरिता योग्य गुंतवणूक पर्याय

सुकन्या समृद्धी योजना की फिक्स्ड डिपॉझिट: मुलीच्या भविष्याकरिता सर्वोत्तम गुंतवणूक कोणती?

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुकन्या समृद्धी योजना की फिक्स्ड डिपॉझिट: गुंतवणूक हा सर्वांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असतो. माणूस जेव्हा कमवायला लागतो तेव्हा त्यातून तो जमापुंजी करून आपला आयुष्य चांगलं घालत असतो आणि जेव्हा मुलं होतात त्यांचं आपल्या आयुष्यात येण्या सोबतच त्यांचं देखील भविष्य घडवन ही मोठी जबाबदारीही असते. त्यांच्या आर्थिक भवितव्याची सुरक्षितता ही प्रत्येक पालकांची मुख्य जबाबदारी असते.

Table of Contents

  • सुकन्या समृद्धी योजना आणि फिक्स्ड डिपॉझिट – मुलभूत माहिती
  • या गुंतवणूक पर्यायांचा लॉक-इन आणि त्यांची तरलता (Liquidity)
  • दोन्ही गुंतवणूक पर्याय साठी उपलब्ध करसवलती व परिणाम
  • सुकन्या समृद्धी योजना की फिक्स्ड डिपॉझिट गुंतवणूक उद्दिष्टांनुसार उपयुक्तता
  • सुकन्या समृद्धी योजना की फिक्स्ड डिपॉझिट उदाहरणे (Illustrative Examples)

मुलगी असेल तर तिचं शिक्षण तिचा विवाह आणि एकूणच सर्व गोष्टींची जबाबदारी नीट पार पाडण्यासाठी मुलींसाठी पालक विचार करू शकतील असे दोन विश्वासार्ह पर्याय म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि पारंपरिक बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD) मुदत ठेवी आहेत. तिथे गुंतवणुकीची सुरक्षितता अधिक आपण पहात असतो.

हे दोन्ही पर्याय सुरक्षित आणि विश्वासार्ह आहेत; परंतु रचना, परतावा आणि करसवलतीच्या दृष्टीने यांच्यात महत्त्वाचे फरक आहेत. कोणता पर्याय निवडायचा हे आपल्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर अवलंबून असते. आणि असे सर्व सुरक्षित पर्याय वापरून आपल्या मुलीचं भविष्य चांगलं करण्यासाठी आपल्या गुंतवणुकीची सर्व बाजू पाहणं आपण रास्त समजतो चला तर मग या दोन्ही पर्यायांचे बारकावे जाणून घेऊया.

सुकन्या समृद्धी योजना आणि फिक्स्ड डिपॉझिट – मुलभूत माहिती

सुकन्या समृद्धी योजना आणि फिक्स डिपॉझिट म्हणजेच SSY आणि FD हे दोन्ही सुरक्षित गुंतवणुकीचे पारंपारिक दृष्ट्या पर्याय मानले जातात. SSY ही ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेली सरकारी योजना आहे. शासनाने परतावा देण्यासाठी हिला अधिक पाठबळ दिलेला आहे. यात मूळ रक्कम आणि व्याजावर सरकारची हमी असते. दुसरीकडे, FD हा तर सर्वांचा पारंपरिक गुंतवणुकीचा मार्ग आहे ज्यात नियमित ठरलेलं व्याज मिळतं सोबतच त्याच्यावर DICGC (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) अंतर्गत ₹५ लाखांपर्यंत विमा सुरक्षा मिळते.

सुकन्या समृद्धी योजना आणि फिक्स डिपॉझिट यांचा परतावा आणि व्याजदरसध्या सुकन्या समृद्धी योजने वर वार्षिक ८.२% व्याजदर (एप्रिल–जून २०२५) मिळतो, जो वार्षिक चक्रवाढ पद्धतीने जमा होतो. तर बँक मुदत ठेवींचे चे व्याजदर साधारणतः ६% ते ७.५% दरम्यान असतात आणि ते बँक व मुदतीनुसार बदलू शकतात. थोडासा फरक जरी दिसत असला तरी दीर्घकालीन गुंतवणुकीत त्याचा मोठा परिणाम होतो.

पोस्ट ऑफिस आरडी 2025: सुरक्षित गुंतवणुकीचा दुर्लक्षित हिरो: सुकन्या समृद्धी योजना की फिक्स्ड डिपॉझिट: आपल्या मुलीच्या भविष्याकरिता योग्य पर्याय कोणता?

या गुंतवणूक पर्यायांचा लॉक-इन आणि त्यांची तरलता (Liquidity)

सुकन्या समृद्धी योजना की फिक्स्ड डिपॉझिट: सुकन्या समृद्धी योजनेची मुदत २१ वर्षे असते, मात्र फक्त पहिल्या १५ वर्षांतच पैसे जमा करावे लागतात. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर अंशतः पैसे काढता येतात. मागील वर्षाच्या शिल्लक रकमेपैकी ५०% पर्यंत रक्कम शिक्षण वा अन्य गरजांसाठी काढता येते. गंभीर परिस्थिती (उदा. मृत्यू, गंभीर आजार, पालकांचा मृत्यू) असल्यास खातं ५ वर्षांनंतर बंद करता येते.

मुदत ठेवी मध्ये मात्र जास्त लवचिक असते. त्याची मुदत ७ दिवसांपासून १० वर्षांपर्यंत असू शकते. आवश्यकतेनुसार मुदतपूर्व पैसे काढता येतात, पण त्यासाठी साधारण ०.५% ते १% दंड आकारला जातो. त्यामुळे तरलतेच्या दृष्टीने FD अधिक उपयुक्त आहे, तर SSY दीर्घकालीन शिस्तबद्ध बचतीसाठी उपयुक्त ठरते. इथे सुकन्या समृद्धी योजना ही तुमच्या मानसिक आणि बहुतांच्या बदलणाऱ्या परिस्थिती मधून घेण्यात येणाऱ्या निर्णयापासून संरक्षण देते.

दोन्ही गुंतवणूक पर्याय साठी उपलब्ध करसवलती व परिणाम

SSY अंतर्गत दरवर्षी ₹१.५ लाखांपर्यंतची गुंतवणूक कलम ८०C अंतर्गत वजावटीस पात्र ठरते. शिवाय मिळणारे व्याज आणि परिपक्वतेची रक्कम पूर्णपणे करमुक्त (Tax-Free) असते. त्यामुळे SSY ही करसवलतीच्या दृष्टीने सर्वात फायद्याची योजना मानली जाते. तुम्ही ठेवलेल्या मुदत ठेवी मध्ये केवळ ५ वर्षांची करबचत मुदत ठेव हा गुंतवणुकीचा पर्याय घेतल्यासच कलम ८०C अंतर्गत वजावट मिळते. मात्र फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेवी वर मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र असते. जर आपण ३०% करस्लॅबमध्ये असाल आणि ७% फिक्स डिपॉझिट वर घेतली तर प्रत्यक्ष परतावा फक्त ४.९% राहतो.

तुम्ही ठेवलेल्या मुदत ठेवी मध्ये केवळ ५ वर्षांची करबचत मुदत ठेव हा गुंतवणुकीचा पर्याय घेतल्यासच कलम ८०C अंतर्गत वजावट मिळते. मात्र फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेवी वर मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र असते. जर आपण ३०% करस्लॅबमध्ये असाल आणि ७% फिक्स डिपॉझिट वर घेतली तर प्रत्यक्ष परतावा फक्त ४.९% राहतो.

लहान मुलांचे पॅन कार्ड कसे काढावे : एक सोपी पध्दत टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि फायदे: सुकन्या समृद्धी योजना की फिक्स्ड डिपॉझिट: आपल्या मुलीच्या भविष्याकरिता योग्य पर्याय कोणता?

सुकन्या समृद्धी योजना की फिक्स्ड डिपॉझिट गुंतवणूक उद्दिष्टांनुसार उपयुक्तता

सुकन्या समृद्धी योजना ही मुलीच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीच तयार केलेली आहे. तिचा लॉक-इन कालावधी पालकांना दीर्घकालीन गुंतवणुकीला बांधून ठेवतो. उदाहरणार्थ, जर मुलगी २ वर्षांची असताना खाते उघडून दरवर्षी ₹१.५ लाख जमा केले तर २१ वर्षांनी सुमारे ₹७१.८२ लाखांचा निधी तयार होऊ शकतो. हा निधी उच्च शिक्षण किंवा विवाह यांसारख्या मोठ्या खर्चासाठी उपयोगी ठरू शकतो.

FD मात्र विशिष्ट उद्दिष्टांशी जोडलेली नसते, पण लघुकालीन गरजांसाठी उत्तम असते. शाळेची फी, कोचिंगचे पैसे, प्रवास खर्च किंवा आपत्कालीन परिस्थितीत FD उपयोगी ठरते. उदाहरणार्थ, २ वर्षांत ₹३ लाखांची गरज असल्यास FD हा योग्य पर्याय आहे.प्रत्यक्षात दोन्हींचा समतोल वापर अधिक चांगला ठरतो – SSY दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी आणि FD अल्पकालीन गरजांसाठी असतो.

फिक्स डिपॉझिट आणि सुकन्या समृद्धी योजना यांच्यातील गुंतवणुकी च्या परताव्याची विविध उदाहरणे पाहायची झाली तर,

सुकन्या समृद्धी योजना की फिक्स्ड डिपॉझिट उदाहरणे (Illustrative Examples)

उदाहरण १ – दीर्घकालीन (SSY):

समजा, मुलगी २ वर्षांची असताना तुम्ही सुकन्या समृद्धी योजना खाते उघडले.दरवर्षी ₹१.५ लाख जमा केले.

व्याजदर: ८.२% वार्षिक चक्रवाढ.

२१ वर्षांनी एकूण निधी: ₹७१.८२ लाख (करमुक्त).

👉 हा निधी मुलीच्या उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी पुरेसा ठरू शकतो.

उदाहरण २ – मध्यम कालावधी (FD):

पालकांना २ वर्षांनी मुलीच्या कोचिंग फीकरिता ₹३ लाखांची गरज आहे.त्यांनी २ वर्षांच्या कालावधीसाठी FD केली.

व्याजदर: ७%.

२ वर्षांनंतर मिळणारी रक्कम: ₹३.४३ लाख (व्याजासह). >SSY मध्ये ही रक्कम वेळेआधी काढता आली नसती, म्हणून FD योग्य पर्याय आहे.

उदाहरण ३ – करसवलत तुलना:

जर कोणी पालक ३०% करस्लॅबमध्ये असतील:FD (७% व्याज) ⇒ करानंतर प्रत्यक्ष परतावा फक्त ४.९%SSY (८.२% व्याज) ⇒ करमुक्त

⇒ पूर्ण ८.२% परतावा.

👉 त्यामुळे करदृष्ट्या SSY हा जास्त फायद्याचा पर्याय आहे.

सुकन्या समृद्धी योजना आणि फिक्स्ड डिपॉझिट हे दोन्ही वेगवेगळ्या आर्थिक गरजा पूर्ण करतात.

SSY : जास्त परतावा, करमुक्ती आणि दीर्घकालीन शिस्तबद्ध गुंतवणूक

FD : जास्त लवचिकता, तरलता आणि अल्पकालीन गरजांसाठी उपयुक्तपालकांनी आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोन्ही पर्यायांचा संतुलित वापर करणे हाच सर्वात शहाणपणाचा निर्णय ठरेल.

टीप : तुमची आर्थिक परिस्थिती व तुमचे उद्दिष्ट याचा योग्य बँक प्रतिनिधी अथवा आर्थिक सल्लागार यांच्याशी करून मग या दोन्हीपैकी कोणत्याही निवड करू शकता.

📌 FAQ विभाग वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q1. सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय?

👉 ही भारत सरकारची मुलींसाठी खास बचत योजना आहे, जिथे वार्षिक 8% पेक्षा जास्त व्याजदर मिळतो आणि करसवलतही मिळते.

Q2. फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि सुकन्या समृद्धी योजनेत काय फरक आहे?

👉 FD लवचिक आहे, 7 दिवस ते 10 वर्ष टेन्युअरपर्यंत ठेवता येतो, परंतु व्याजावर कर लागू होतो. SSY 21 वर्षासाठी लॉक-इन असते, पण परतावा आणि व्याज दोन्ही करमुक्त असतात.

Q3. सुकन्या समृद्धी खातं कधी उघडता येतं?

👉 मुलगी 10 वर्षांची होईपर्यंत पालक खाते उघडू शकतात.

Q4. सुकन्या समृद्धी योजना की FD – दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कोणती चांगली?

👉 मुलीच्या उच्च शिक्षण/लग्नासाठी दीर्घकालीन बचत हवी असल्यास SSY सर्वोत्तम आहे. तर FD तातडीच्या गरजांसाठी अधिक योग्य आहे.

Q5. मी दोन्ही गुंतवणूक करू शकतो का?

👉 हो, संतुलित पोर्टफोलिओसाठी SSY दीर्घकालीन आणि FD अल्पकालीन गरजांसाठी ठेवणे फायदेशीर ठरते.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X

Like this:

Like Loading...

Related

Tags: Best investment for girl child IndiaFixed Deposit vs Sukanya Samriddhi YojanaSukanya Samriddhi Yojana vs FDसुकन्या समृद्धी योजना 2025

Related Posts

New Labour code 2025भारतातील कामगारांसाठी १५ दिवसांच्या पगाराची तरतूद आणि नवीन श्रम कायद्यांची अंमलबजावणी
अर्थविश्व

नवीन लेबर कोड लागू!नोकरी गमावलेल्यांना ‘री-स्किलिंग फंड’सह नोकरीवरून कमी केल्यास मिळणार१५ दिवसांचा अतिरिक्त पगार !

30 November 2025
EPFO pension increase update 2025 – minimum pension ₹5,500
अर्थविश्व

EPFO पेन्शन वाढ: किमान मासिक पेन्शन ₹5,500 पर्यंत वाढण्याची शक्यता!

18 November 2025
SBI ने mCASH सेवा 1 डिसेंबरपासून बंद करण्याची घोषणा; जाणून घ्या कारण
अर्थविश्व

SBI mCASH service update : एसबीआय ग्राहकांनो लक्ष द्या! 1 डिसेंबरपासून ही सेवा बंद करणार !

16 November 2025

Sip calculator

SIP Calculator Widget

SIP Calculator

Invested Amount
Est. Returns
Total Value

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Age calculator

Age Calculator Widget

Age Calculator

Your calculated age will appear here.
ऋतू बदलताच आजारी का पडतो?

ऋतू बदलताच आजारी का पडतो? या ‘या’ चुका टाळा आणि इम्यूनिटी वाढवा!

by vidhanwarta
10 November 2025
0

ऋतू बदलताच आजारी का पडतो? प्रत्येक ऋतू बदलाच्या वेळी अनेकांना सर्दी, खोकला, ताप किंवा ॲलर्जीचा त्रास होतो. उन्हाळा संपून पावसाळा...

NABARD Recruitment 2025 :

NABARD Recruitment 2025:  नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया ८ नोव्हेंबरपासून सुरू

by vidhanwarta
6 November 2025
0

NABARD Recruitment 2025 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) ने असिस्टंट मॅनेजर (ग्रेड अ) भरती २०२५ साठी एक संक्षिप्त...

shivsena vs bjp शिंदे गट विरुद्ध भाजप – रवींद्र चव्हाण वादामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष

Shivsena vs Bjp:शिंदे गटाची खरी नाराजी चव्हाणांवरच? – महायुतीतला अंतर्गत संघर्ष शिगेला! ‘मित्रां’मधील मतभेद चव्हाट्यावर!

by vidhanwarta
18 November 2025
0

Shivsena vs Bjp: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलं आहे. भाजप–शिंदे शिवसेना महायुतीमध्ये 'वरवरची शांतता' आणि 'आतला खदखदणारा संघर्ष' हे...

EPFO pension increase update 2025 – minimum pension ₹5,500

EPFO पेन्शन वाढ: किमान मासिक पेन्शन ₹5,500 पर्यंत वाढण्याची शक्यता!

by vidhanwarta
18 November 2025
0

EPFO पेन्शन वाढ: खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, कारण केंद्र सरकार कर्मचारी निवृत्तीवेतन योजना (EPS) अंतर्गत किमान...

ADVERTISEMENT
निवडणुकीत ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध आणि शांततेचा प्रचार

निवडणुकीचा प्रचार ‘शांत’ वातावरणात! रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक वापरल्यास थेट कारवाई !

by vidhanwarta
13 November 2025
0

restrictions on loudspeaker : नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मात्र,...

यामाहा XSR 155

यामाहा XSR 155 भारतात लॉन्च – किंमत, फीचर्स आणि सविस्तर माहिती निओ-रेट्रो रोडस्टरचा आधुनिक अवतार!

by vidhanwarta
13 November 2025
0

यामाहा XSR 155 : भारतीय मोटरसायकल बाजारात यामाहाने आणखी एक आकर्षक नवा पर्याय सादर केला आहे. कंपनीने आपली लोकप्रिय यामाहा...

  • About us
  • contact us
  • disclaimer
  • Privacy Policy
  • homepage

Copyright © 2025 Vidhanwarta | Design By Webfire Degitech.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • अर्थविश्व
  • आरोग्य
  • ऑटोमोबाईल
  • कृषी
  • क्रीडा
  • देश विदेश
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • शिक्षण व रोजगार

Copyright © 2025 Vidhanwarta | Design By Webfire Degitech.

%d