Tata Harrier Adventure X भारतात लॉन्च; ₹18.99 लाखांपासून सुरुवात, जाणून घ्या फीचर्स

टाटा मोटर्सने आपली लोकप्रिय एसयूव्ही हॅरियरचा नवीन व्हेरिएंट Tata Harrier Adventure X भारतात लॉन्च केला आहे. या व्हेरिएंटची किंमत ₹18.99 लाख (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे. हॅरियर अॅडव्हेंचर X हा व्हेरिएंट Adventure आणि Adventure Plus या ट्रिम्सच्या मध्ये सादर करण्यात आलेली आहे .याचबरोबर टाटाने Safari Adventure X हे सफारीचं मॉडेल देखील बाजारात आणलं आहे.

टाटाने 2025 मध्ये आपल्या हॅरिअर SUV साठी नवीन वेरिएंट ची लाईनअपच सादर केली आहे, ज्यामध्ये दोन नवीन वेरिएंट्सचा समावेश आहे: Adventure X आणि Adventure X Plus. या दोन मॉडेल्सच्या सादरीकरणामुळे ग्राहकांसाठी आता हॅरियर च्या SUVची एकूण सहा वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे:Smart, Pure X, Adventure X, Adventure X Plus, Fearless X, आणि Fearless X Plus. त्यामुळे खरेदी करणाऱ्यांना आपल्या आवश्यकतेनुसार खूप सारे पर्याय या वाहनांमध्ये टाटाने उपलब्ध करून दिले आहेत.

डिझाइनच्या दृष्टीने पाहता, सफारी आणि हॅरियर या दोन्ही SUV मध्ये कोणतेही वेगळे बदल करण्यात आलेले नाहीत; दोन्ही गाड्यांची आकर्षकता पूर्वीप्रमाणेच कायम ठेवलेली आहे. सफारीमध्ये 18-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, तर हॅरियरमध्ये 17-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.दोन्ही SUV च्या केबिनमध्ये काहीशा सुधारणा करण्यात आल्या आहेत. ज्या आणखी आरामदायक प्रवासासाठी नक्कीच खास ठरतील. हॅरियरमध्ये Onyx Trail इंटिरिअर्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये टॅन इन्सर्ट्ससह ब्लॅक लेदरेट सीट्स दिल्या आहेत. दुसरीकडे, सफारीमध्ये Adventure Oak इंटिरिअर्स मिळतात, ज्यामध्ये ब्लॅक इन्सर्ट्ससह टॅन लेदरेट अपहोल्स्टरी देण्यात आलेली आहे. हे सर्व वैशिष्ट्य तुम्हाला लांब पडण्याचा प्रवास करण्यासाठी देखील सुखकारक ठरतील.

Tata Harrier Adventure X:काय आहे खासियत?

○नवीन हॅरियर Adventure X मध्ये ग्राहकांसाठी प्रगत फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये:

○10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

○फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

○पॅनोरामिक सनरूफ

○ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल

○मेमरी फंक्शनसह इलेक्ट्रिक ड्रायव्हर सीट

●वायरलेस चार्जिंग

●360 डिग्री कॅमेरा

●Level 2 ADAS (Advanced Driver Assistance System)

याशिवाय, नवीन ग्रीन एक्स्टेरिअर पेंट आणि Onyx Trail थीम असलेले इंटिरिअर या नवीन डिझाइन हायलाइट्स देण्यात आल्या आहेत. ज्या एकदम आकर्षक वाटतात.

हे पण वाचा:- Tata Nano 2025: सनरूफ, 40kmpl मायलेज आणि आधुनिक फिचर्ससह पुन्हा येणार बजेट कारचा बादशाह

Tata Harrier Adventure X इंजन व परफॉर्मन्स

हॅरियर Adventure X मध्ये 2.0-लिटर Kryotec डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल तसेच 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह सादर केले गेले आहे.

Tata Harrier 2025 चे वेरिएंटनिहाय फीचर्स आपण पाहू

1️⃣ Smart (बेस व्हेरिएंट)

LED प्रोजेक्टर हेडलाईट्स व DRLs17-इंच अलॉय व्हील्स

6 एअरबॅग्स,

ESP, हिल-स्टार्ट असिस्ट, I

SOFIX7-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेफॅब्रिक सीट्स

इन्फोटेनमेंट टचस्क्रीन नाही

2️⃣ Pure / Pure X

बेस फीचर्ससह:10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले

पॅनोरामिक सनरूफ (Pure X मध्ये)

क्रूझ कंट्रोल

Auto Fold ORVMs

स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स

Push Start-Stop बटन

3️⃣ Adventure / Adventure X

Pure X वेरिएंटसह:10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट

ब्लॅक लेदरेट सीट्स (टॅन अ‍ॅक्सेंटसह)

Terrain Drive Modes (Normal, Rough, Wet)

360-डिग्री कॅमेरा

6-Way इलेक्ट्रिक ड्रायव्हर सीट (Adventure X Plus मध्ये)

ऑनिक्स ट्रेल इंटीरिअर्स थीम

4️⃣ Safety & ADAS (Adventure X Plus मध्ये)

Level-2 ADAS (Adaptive Cruise Control सह)

ड्रायव्हर डोझ-ऑफ अलर्ट

इलेक्ट्रॉनिक पार्किंग

ब्रेकक्वॉड डिस्क ब्रेक्स (सर्व चाकांवर)

रेन सेंसिंग वायपर्स

GNCAP 5-स्टार सेफ्टी रेटिंग

किंमती

(एक्स-शोरूम अंदाजे)Smart – ₹15.49 लाख पासून

Adventure X – ₹18.99 लाख

Adventure X Plus – ₹20 लाखांपेक्षा अधिक

अधिक माहिती साठी:-