टिकटॉक (TikTok) पुन्हा सुरू झाल्याच्या बातम्यांना भारत सरकारने पूर्णविराम दिला आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की टिकटॉकवरील बंदी पूर्वीप्रमाणेच कायम आहे आणि ती उठवल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक युजर्सना टिकटॉकची वेबसाईट उघडता येत असल्यामुळे हा गैरसमज पसरला होता. TikTok अॅपमध्ये लॉगिन किंवा व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा सध्या कार्यरत नाही. म्हणजेच, ही वेबसाइट फक्त डेमो स्वरूपात चालू असावी.
अमेरिकेने भारतावर लादलेल्या टेरिफ नंतर भारत-चीन या दोन देशाच्या राजनैतिक व प्रशासकीय पातळीवर खुप साऱ्या घडामोडींना उधान आले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन च्या मंत्र्यांच्या नुकत्याच घेतलेल्या भेटीमुळे TikTok वरची बंदी उठवण्यांच्या आफवांना अधिक बळ मिळाले.
बंदी का घालण्यात आली होती?
तुम्हाला आठवत असेल, २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सांगत टिकटॉकसह ५९ चिनी मोबाईल ऍप्लिकेशन्सवर बंदी घातली होती. गुप्तचर यंत्रणांनी या ऍप्सबद्दल धोक्याची सूचना दिली होती. या ऍप्सद्वारे वापरकर्त्यांची माहिती (data) गोळा करून ती देशाबाहेर पाठवली जात असल्याचा मोठा संशय होता. सरकारच्या मते, ही ऍप्लिकेशन्स “भारताची सार्वभौमत्व आणि अखंडता, देशाचे संरक्षण आणि सार्वजनिक सुव्यवस्था” यासाठी धोकादायक होती.
TikTok वरची बंदी उठवली? ‘या निव्वळ अफवा !
टिकटॉक (TikTok) पुन्हा सुरू झाल्याच्या बातम्यांना भारत सरकारने पूर्णविराम दिला आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की टिकटॉकवरील बंदी पूर्वीप्रमाणेच कायम आहे आणि ती उठवल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक युजर्सना टिकटॉकची वेबसाईट उघडता येत होती. त्यामुळे अनेकांच्या मनात आशा पल्लवित झाली होती की कदाचित सरकारनं बंदी उठवली असावी. हीच गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आणि टिकटॉकच्या पुनरागमनाच्या चर्चांना उधाण आलं.
सरकारी सूत्रांनी हा गैरसमज दूर केला आहे. त्यांनी सांगितलं की, “वेबसाईट काही प्रमाणात दिसत असली तरी, याचा अर्थ बंदी उठवली असा होत नाही.” सरकारने आठवण करून दिली की २०२० मध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घालण्यात आली होती आणि ती कारणं आजही कायम आहेत.
सध्या परिस्थिती अशी आहे की, वेबसाईट दिसत असली तरी त्यावर व्हिडिओ अपलोड करणे किंवा पाहणे यांसारख्या मुख्य सुविधा बंद आहेत. तसेच, गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) आणि ऍपल ऍप स्टोअर (Apple App Store) वरूनही हे ऍप्लिकेशन अजूनही गायब आहे. ही उपलब्धता सर्व्हिस प्रोव्हायडरवर (ISP) अवलंबून आहे — जसे की काहीं लोकांना Vodafone‑Idea वर वेबसाइट दिसत आहे, पण Jio वर दिसत नाही.
इंस्टाग्रामची नवी फीचर्स: संवाद वाढवण्यास मदत
TikTok वरची बंदी उठवली? काँग्रेसचा हल्लाबोल;
टिकटॉक (TikTok) पुन्हा सुरू झाल्याच्या बातम्यांना भारत सरकारने पूर्णविराम दिला असला तरी, या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. टिकटॉक आणि अलीएक्सप्रेस (AliExpress) सारख्या चिनी कंपन्यांच्या वेबसाईट भारतात पुन्हा सुरू झाल्याने काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “शहीद जवानांच्या बलिदानाचा सौदा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनसोबत डील करत आहेत,” असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.
“चीनशी लढायात 20 शूर सैनिकांचे बलिदान झाले. सुरुवातीला मोदींनी चीनला क्लीन‑चिट दिली. मग काँग्रेसने दबाव टाकला आणि हेडलाइन मॅनेजमेंट म्हणून TikTok बॅन करण्यात आला. आता नरेंद्र मोदी पुन्हा चीनसोबत ‘लप्पो‑झप्पो’ करत आहेत—आणि तशीच ही TikTok ची बातमी आली. स्पष्ट आहे—मोदींचं चीनप्रेम, देशप्रेमावर जास्त आहे.”
मोदी सरकार चीनशी “शहादतीच्या किमतीवर सौदा” करत आहे—यानुसार, 2020 मध्ये चीनसोबत झालेल्या गलवान टकरावात भारतीय सैनिकांच्या बळीबद्दल उद्दिष्ट साधण्याऐवजी चीनच्या अनुकूल धोरणातून TikTok वेबसाइट पुन्हा सुरू होणे हे स्पष्ट चिन्ह आहे असे काँग्रेसचे म्हणणे आहे, “Just like ceasefire with Pakistan”, तसाच चीनासोबत सौदा करण्यात आला आहे, म्हणजेच TikTok वेबसाइट पुन्हा भारतात सुरु होणे म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य व मर्यादांशी समझोता अशा शब्दात काँग्रेस कडुन टीका करण्यात आली.
पण दुसरीकडे संबंध सुधारत आहेत…
एकीकडे ऍप्सवर बंदी कायम असताना, दुसरीकडे भारत आणि चीन आपले संबंध सुधारण्यासाठी सकारात्मक पावलं उचलत आहेत. नुकतेच, लिपुलेख पास, शिपकी ला पास आणि नथु ला पास या तीन मार्गांवरून दोन्ही देशांमधील सीमा व्यापार पुन्हा सुरू झाला आहे. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यावर आणि हवाई सेवा करारात (Air Services Agreement) सुधारणा करण्यावरही एकमत झाले आहे. तसेच, पर्यटक, व्यावसायिक आणि पत्रकार यांच्यासाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.
एवढंच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेसाठी चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि इतर जागतिक नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, जरी टिकटॉकवरील बंदी कायम असली तरी दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र दिसत आहे.
थोडक्यात काय, तर टिकटॉकच्या चाहत्यांना अजून वाट पाहावी लागणार आहे. सरकारने आपला निर्णय ठाम ठेवला असून, तूर्तास तरी टिकटॉकवरील बंदी उठण्याची कोणतीही शक्यता नाही.
related info:










Leave a Reply